У нас вы можете посмотреть бесплатно Guru Paduka Stotram | श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज| श्रीगुरुप्रतिपदा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्रीस्वामी महाराजांची बरीच प्रसिद्धी झाली व अधिक उपाधी वाढू नये म्हणून यात्रेच्या निमित्ताने श्रीपर्वतास जावे व दृश्य स्वरुपात गाणगापूर सोडावे असा विचार महाराजांनी केला व त्याप्रमाणे आपले मनोगत आपल्या शिष्यांस विदित केले. सर्व शिष्य व भक्त यांना अतिशय वाईट वाटले. “मी दृश्य स्वरुपात ह्या पार्थिव देहाने नसलो तरी गुप्त रितीने व अमूर्त स्वरुपात माझ्या प्रेमळ व अनन्य भक्तांकरिता मी गाणगापुरातच नित्य वास करणार आहे. मी माझ्या निर्गुण पादुका येथे ठेवितो व तेच माझे मूर्त स्वरूप आहे असे समजा व निश्चिंत राहा” असे आश्वासन देऊन महाराजांनी सर्वांचे समाधान केले. नंतर महाराज पुष्पासनावर बसून नदीतून कर्दळीवनाकडे जावयास निघाले. नावाड्या बरोबर महाराजांनी निरोप पाठविला की “आम्ही जातो कलि पाहोनी | सदा वसो गाणगाभुवनी” मठावर पोहोचल्यावर चार प्रसादपुष्पे येतील ती सायंदेव, नंदी, नरहरी व सिद्ध या चार शिष्यांनी घ्यावी. थोड्या वेळाने ते चिरपरिचित तेजोमय रूप हळूहळू धूसर दिसू लागले आणि प्रकाशाच्या असीम अर्णवात लुप्त झाले. #NrusimhaSaraswatiSwamiMaharaj #नरसोबाचीवाडीश्रीक्षेत्रनृसिंहवाडी #नरसिंहसरस्वतीस्वामीमहाराज #दत्तात्रयाचेदुसरेअवतारनृसिंहसरस्वती #श्रीगुरुप्रतिपदा