У нас вы можете посмотреть бесплатно Ghar Aaja Ghir Aaye - Ninaad Ajgaonkar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ghar Aaja Ghir Aaye. This song is a humble tribute to Gaan Samradni Lata Mangeshkar by Ninaad Ajgaonkar, on her 91st birthday. This was the first of the many beautiful compositions from the dynamic duo - Lata Mangeshkar and R.D. Burman. From the film "Chhote Nawab", this song beautifully depicts the longing and loneliness felt by the protagonist. Enjoy this beautiful rendition brought to you by Swar Ninaad, and do let us know your thoughts in the comment section. Give this video a big thumbs up and Subscribe to our channel for more. Hit the bell icon to get a notification every time we post! Video Courtesy : Sameer Tendolkar. Lyricist : Shailendra, Original Singer : Lata Mangeshkar, Music Director : Rahul Dev Burman, Movie : Chhote Nawab (1961) Listen to the full song on: • Ghar Aaja Ghir Aaye - Ninaad Ajgaonkar ______________________________________ अशीच एक सुंदर संध्याकाळ होती. आम्ही तिघे-चौघे, समीरच्या अत्यंत देखण्या घरी बसलो होतो. सुरांमध्ये डुबक्या मारून, पोहोण्याचे प्रयत्न चालले होते. आम्ही आमच्यातच मस्त होतो, खुश होतो. गाण्यांच्या आठवणी निघायच्या, किस्से उजळले जायचे आणि पाठोपाठ लकेरी.. मजा येत होती.. वेळ काळ अशा मर्त्य गोष्टींचा, साफ विसर पडला होता. गप्पांची गाडी सहजच लता नावाच्या जंक्शनवर येऊन थांबली. या गाडीला कसलाच मेकअप करण्यात रस नसल्याने, कोणत्या स्टेशनवर किती वेळ थांबावे, याला काहीच धरबंध नव्हता. त्यातून हे असले जंगी जंक्शन.. आणि आमचा अतीव लाडका विषय, त्यामुळे लताबद्दल ओसंडून बोलतही होतो आणि समरसून ऐकत ही होतो. अचानक माझा फोन वाजला, रिंगटोनवर लताचा स्वर ऐकू आला आणि आम्ही सारेजण एकदम तंद्रीतून बाहेर येऊन क्षणभर निःशब्द झालो. साठच्या दशकाची सुरवातीची वर्षे, हिंदी चित्रपट संगीताचे सुवर्णयुग अजूनही सुरुच होते.. शंकर जयकिशन, एस्.डी.बर्मन , नौशाद, मदनमोहन, ओ.पी.नय्यर, रोशन, आणिकही अशाच अनेक गुणवंतांनी हिंदी चित्रपट संगीताची मोहिनी भारतवर्षावर घातलेली होती. अशाच वेळी एक नवा शिलेदार, या भरजरी क्षितिजावर आपल्याही नशीबाचा तारा उजळवण्याचा प्रयत्न करत होता. वडीलांची दिगंत कीर्ती सांगून काही काम मिळवणे शक्य असेलही, पण त्यातील फोलपणा समजण्यासाठी, समर्थांनी सांगितलेली मूर्खांची लक्षणे माहीत असायलाच हवीत, असे थोडीच आहे. या स्वयंप्रज्ञ तरूणाला असल्या कसल्याही कुबड्यांची गरज नव्हती. नाही म्हणायला मेहमूद सारख्या सच्च्या मित्राने दिलेला शब्द होता. आणि त्याचवेळी छोटे नवाब नावाचा एक चित्रपट मिळाला. एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल, मी राहुल देव बर्मन म्हणजेच पंचमदांविषयी बोलतोय. पंचमची एक जबरदस्त इच्छा होती, ती म्हणजे, आपले पहिले गाणे लताच्या आवाजात रेकॉर्ड व्हावे. खरं तर लताने आपले एकतरी गाणे गावे, अशी चित्रपट संगीतविश्वातील प्रत्येकच संगीतकाराची इच्छा असते, असो.. इथे पंचमच्या या विशिष्ट अटीविषयी, छोटे नवाबच्या निर्मात्याचीही काही हरकत नव्हती. पण.. हा पण मात्र तसा मोठा होता, कारण त्या सुमारास लता आणि सचिन देव बर्मन एकत्र काम करत नव्हते. काही फार मोठे भांडण किंवा बेबनाव झाला होता असे नाही. पण अशी काहीतरी चमत्कारिक अवस्था होती, की दोघे एकत्र काम करत नव्हते. पंचमची त्यामुळेच मोठी पंचाईत झाली होती. हा तिढा कसा सुटणार, अशा पेचात तो असताना, मेहमूदनेच पुढाकार घेतला आणि दोघेही थेट लताला एका रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये जाऊन भेटले. चहाच्या कपाआडून मिश्किलपणे हसत तिने अतिशय प्रेमाने या दुकलीचे स्वागत केले, आणि स्वतःच्या अत्यंत धावपळीच्या शेड्युल मध्येही, पंचमला त्याच्या सोयीची एक डेट देऊन टाकली. लता आणि पंचम या असामान्य युतीने पुढच्या तीसेक वर्षांत हिंदी चित्रपट संगीताचे दालन समृद्ध केले आणि रसिकांना स्वरश्रीमंत केले. या श्रीमंतीची ही पहिली सुवर्णमुद्रा, शैलेंद्रची अप्रतिम शब्दकळा असलेले, या दोघांनी संगीत रसिकांना दिलेले, हे पहिलेच गाणे. माझ्या फोनवर याच गाण्याचा रिंगटोन वाजला आणि साहजिकच आम्ही सगळे या गाण्यात बुडून जायला सिद्ध झालो. समीरने त्याचा कॅमेरा सरसावून, आमच्या कृतज्ञतेचे हे क्षण आमच्यासाठी चिरंजीव केले. लता मंगेशकर नावाचा चमत्कार, याची देही याची डोळा(खरंतर काना), वर्षानुवर्षे अनुभवता येणे ही, आपल्यावर ईश्वराची केवढी प्रचंड कृपा आहे, याची जेव्हा मला जाणीव झाली, तो माझ्या आयुष्यातील साक्षात्काराचा क्षण, मी कृतज्ञतेने कायमचा जपून ठेवलेला आहे. लतादीदींना वाढदिवसाच्या अनेकोत्तम आणि मंगलमयी अशा खूप खूप शुभेच्छा..!! जीवेत शरदः शतम् ! निनाद आजगांवकर. _________________________________________