У нас вы можете посмотреть бесплатно रती वाळ कार्यक्रम कोठुळा 2022 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आदिवासी परंपरेनुसार हा कार्यक्रम म्हणजे रति वाळ हा आदिवासी समाजामध्ये सर्व परी कार्यक्रम केला जातो याचा कालावधी तीन महिने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर व जास्तीत जास्त जानेवारीच्या पंधरा तारखेच्या आत केला जातो आमच्या वडीलधाऱ्या माणसांकडून त्यांच्या माहितीनुसार ते सांगतात की पूर्वीच्या काळी आमचे पूर्वज हा कार्यक्रम मोठा उत्सव करत असत आमची लोक जुन्या परंपरेनुसार अनेक वाद्य वापरत असत त्यामध्ये तूर वाद्य पावरी वाद्य ढोल वाद्य घांगळी सर थाळी अशा अनेक प्रकारची वाद्य ह्या कार्यक्रमासाठी वापरत असत व त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणे उत्सव साजरा करत व त्यामध्ये मोठ्या संख्येने आपला समाज सहभाग घेत असे आम्ही एका वडीलधाऱ्या आजोबास विचारले असता त्यांनी आम्हाला एक जुनी कहाणी सांगितले ते पुढील प्रमाणे आम्ही तुम्हाला कथन करत आहोत ती अशी ज्यावेळेस रतिकार व तुळीकार असा प्रकार घडला प्रतिकार व तुळीकार म्हणजे पृथ्वी दगड जंगल ह्या भूतला वरती पृथ्वी सकट सर्व नाहीसे झाले त्यावेळेस देव एकत्र येऊन विचार करू लागले व आता आपले जीवन कसे होईल व आपल्या पृथ्वीचे काय कसे करावे म्हणून त्यांनी एक बैठक घेतली आणि त्यावर विचार करू लागले का ह्या जगाचा पाटील कोणाला बनवायचे त्यावर काही देवतांनी उत्तर दिले की या जगाचा पाटील आपण महादेवाला बनवूया त्यामध्ये पृथ्वीची गादी व आकाशाचे छत्री हे आपण महादेवाला देऊया हे म्हणणे ढग देव मेघदेव यांना पटले नाही व ते देवांना सांगू लागले की आकाशाची छत्री व पृथ्वीची गादी हे आम्हाला द्या परंतु ती छत्री व गादी देवांनी देण्यास नकार दिला त्यावर ढग देव आणि मेघदेव यांनी या सृष्टीचा राग धरून नाश करण्याचे ठरवले व त्यांनी नाश करण्यास सुरुवात केली नंतर देवांनी विचार करून आता ही पृथ्वी म्हणजे दगड जंगल नष्ट झाले आहे हे आपण परत कसे आणावे त्यासाठी आपण काय केले पाहिजे म्हणून यांनी एक बैठक घेऊन विचारपूस करायला सुरुवात केली त्यावेळेस काचणे पुराच्या नगरीमध्ये आपली ही कंसरा येऊ कंसरा ही राहत होती मग सर्वांनी मिळून तिच्याकडे जाण्याचे जाण्याचे ठरवले व तेथे जाऊन येऊ कचरा यांना पृथ्वीवरील दगड जंगल झाडझुडपे बी बियाणे हे परत आणण्याची विनंती केली व तिच्याकडे ती मागणी केली मग हे आज आपल्याला जेवढं जंगल दगड झाडेझुडपे दिसतात ही येऊ कंसरा तिने दिलेली देणगी आहे असे आमच्या वडीलधाऱ्या आजोबांनी सांगितले अशा पद्धतीची अजून खूप माहिती आहे ती आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितली ती माहिती आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी खूप वेळ लागेल त्यासाठी आम्ही थोडक्यात ही माहिती दिली आहे आदिवासी समाजामध्ये सर्व गाव मिळून गावकरी मिळून असे कार्यक्रम सात वर्षानंतर करत असतात काही गावांमध्ये पाच वर्ष तर काही गावांमध्ये सात वर्ष अशा अंतराने असे उत्सव साजरे करत असतात व त्या कार्यक्रमात सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होतात ह्या कार्यक्रमासाठी पूर्ण गावाचा सहभाग असतो व त्याचा खर्च हा प्रत्येक परिवाराकडून वर्गणीच्या स्वरूपात जमा केला जातो त्याचा हिशोब गावाचे प्रमुख हे सर्वांसमोर दाखवत असतात व शेवटच्या दिवशी प्रत्येक रुपयाचा खर्च कसा झाला याचा पूर्ण हिशोब गावासमोर वाचन करून दाखवतात म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला सर्व गाव मंडळी आनंदाने पुढील वर्गणी देताना खुशी खुशी ने वर्गणी देत असतात त्यामध्ये कुठलाही फेरफार होत नसून पैसे किंवा रक्कम जर उरली तर त्याचा उपयोग गावाच्या चांगल्या कार्यासाठी वापरतात उदाहरणार्थ एखाद्या गरीब परिवाराला गरज असेल किंवा आर्थिक परिस्थिती तो कमी असेल तर त्या रकमेचा उपयोग त्यासाठी करतात आपल्या आदिवासी समाजात एकीचे कारण म्हणजे तेच आहे सर्वजण एकत्र येऊन असे कार्य मोठ्या आनंदाने उत्साहाने कार्यक्रम करत असतात व त्यासाठी कोणाचाही अडथळा नसतो कारण सर्वांना माहीत आहे की आपल्या आदिवासी कुलदैवत यांचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे पण तो सर्वांनी मिळूनच करतात पूर्वीपासून ही परंपरा सतत चालू असल्यामुळे सर्वांना एकत्र राहून हे कार्य करावे लागते त्यासाठी गावाचे प्रमुख एकत्र येऊन याचे नियोजन करतात व त्यांच्या वडीलधाऱ्या अनुभवी व्यक्तींकडून याची पूर्ण माहिती घेऊन हे कार्य पूर्ण करतात