У нас вы можете посмотреть бесплатно जमात-उल-मुमिनात : दहशतवादविरोधी लढ्यापुढचे नवे आव्हान или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जैश-ए-मोहम्मद’ने ‘जमात-उल-मुमिनात’ ही महिला आत्मघातकी दहशतवादी संघटना स्थापन केली आहे. कट्टर इस्लामी असणार्या ‘जैश-ए-मोहम्मद’ने, आतापर्यंत महिलांची भरती करणे आणि त्यांना शस्त्र प्रशिक्षण देणे टाळले होते. ही भूमिका पूर्णपणे बदलून महिलांना शस्त्र प्रशिक्षण देऊन, प्रसंगी स्वत:ला ठार मारून संघटनेचे कार्य पुढे चालवण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. यामागे त्यांचे ध्येय आहे, काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करणे आणि पाकिस्तानमध्ये विलीन करणे! ‘जैश-ए-मोहम्मद’ या सुन्नी इस्लामी दहशतवादी संघटनेने नुकतेच दि. ८ ऑक्टोबर रोजीपासून, आत्मघातकी महिलांची दहशतवादी संघटना ‘जमात-उल-मुमिनात’ सुरू केली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मसूद अजहर (मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघटनेने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.) याची बहीण सादिया अजहर, ‘जमात-उल-मुमिनात’ या आत्मघातकी महिला दहशतवादी संघटनेची प्रमुख आहे. तिचा पती युसुफ अजहर ‘ऑपरेशन सिंदूर’ (दि. ७ मे)दरम्यान, भारतीय लष्कराने मरकज सुबहान अल्लाह येथील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात ठार झाला होता. ‘जैश-ए-मोहम्मद’ने ‘जमात-उल-मुमिनात’ या नावाने महिलांची दहशतवादी संघटना सुरू केली आणि आपली भूमिकासुद्धा बदलली. मसूद अजहरच्या नेतृत्वाखालील या संघटनेने, याआधी इस्लामी महिलांना सशस्त्र किंवा लढाऊ भूमिकांपासून दूर ठेवले होते. आता इस्लामी महिलांची भरती, शस्त्र प्रशिक्षणच नव्हे, तर या इस्लामी महिलांना आत्मघातकी दहशतवादी बनण्याचे प्रशिक्षणही देण्याची घोषणा केली. कारण ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादी संघटनांना पुरेसे पुरुष दहशतवादी मिळत नाहीत म्हणून आता त्यांनी महिला दहशतवादी भरती करायची सुद्धा तयारी सुरू केलेली आहे. यामुळेसिंदूरचा घाव किती खोलवर जिव्हारी लागला आहे, याची कल्पना यातून करावी! केवळ घोषणाच नव्हे तर, याची भरती प्रक्रियाही पाकिस्तानातील बहावलपूरमधील मरकज उस्मान-ओ -अली येथे सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या ‘जमात-उल-मुमिनात’ने शहरी आणि सुशिक्षित महिलांना हेरून त्यांना भरती करण्यासाठी सोशल मीडियाचा म्हणजे, व्हॉट्सअॅप इत्यादीचा वापर करणे चालू केले आहे. ‘जमात-उल-मुमिनात’ या संघटनेचे नेतृत्व सादिया अजहरकडे देणे यातूनसुद्धा अनेक गर्भित अर्थ निघतात. या संघटनेने ‘जैश-ए-मोहम्मद’शी जोडलेल्या, ठार झालेल्या सैनिकांच्या पत्नीची यादी करायला घेतली आहे. शिवाय, बहावलपूर, कराची, मुझफ्फराबाद, कोटली, हरीपूर आणि मानसेहरा या ठिकाणच्या अभ्यास केंद्रातील महिलांनासुद्धा, यात सहभागी करून घेण्यावर भर दिला आहे. महिलांचा आत्मघातकी दहशतवादी म्हणून वापर, वास्तविक महिलांचा आत्मघातकी दहशतवादी म्हणून वापर, ‘एलटीटीई’ आणि ‘बोको हराम’ या कट्टर इस्लामी दहशतवादी संघटनांनी यापूर्वी केला आहे. आतापर्यंत ‘जैश-ए-मोहमद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ यांनी तसे केले नव्हते. पण आता, मसूद अजहर आणि त्याचा भाऊ ताल्हा अल सैफ यांनी, महिलांची भरती आणि त्यांना आत्मघातकी दहशतवादी बनण्यासाठीचे प्रशिक्षण देण्याची तयारी चालवली आहे. म्हणूनच ‘जमात-उल-मुमिनात’ची स्थापना, ही ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरची मोठी घटना मानली जाते. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात, सुमारे १०० किमी आत असलेल्या जैशच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि त्याचे चार निकटवर्ती सहकारी ठार झाले. त्यात त्याची मोठी बहीण, तिचा पती, एक भाचा आणि त्याची पत्नी, एक भाची तसेच, पाच इतर नातेवाईकांचाही समावेश होता. याचा प्रतिशोध घेणे ही भावना तर आहेच; पण काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देणे हे ‘जमात-उल-मुमिनात’चे मुख्य ध्येय आहे. या संघटनेने फिदायीन म्हणजेच, आत्मघातकी दहशतवादी तयार करणे आणि त्यांचा साधन म्हणून वापर करणे अशी योजना आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ ही देवबंदी सुन्नी इस्लामी दहशतवादी संघटना असून, त्यांचे ध्येयसुद्धा जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडून त्याला पाकिस्तानला जोडणे हे आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे अनेक महिलांचे प्राण घेण्यात आले, असा अपप्रचार त्यांनी चालवलेला आहे. जैशने त्यांचे प्रशिक्षण केंद्र आता पाकव्याप्त काश्मीरवरून, खैबर पख्तूनख्वा येथे हलवले आहे. कारण, हा भाग तुलनेने भारतीय सीमेपासून दूर आहे. ‘जमात-उल-मुमिनात’ ही नवीन महिला संघटना, ‘जैश-ए-मोहम्मद’च्या मानिसक युद्ध आणि स्थानिक स्तरावरील भरती या बदलत्या धोरणाचा भाग आहे. ती जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील शिक्षित, शहरी मुस्लीम महिलांना लक्ष करीत आहे. तिथे त्यांचे जाळे ऑनलाईन पसरवले जात आहे. ही संघटना स्वतःला ‘इस्लामी सुधार चळवळ’ मानते. जैशच्या संरचनेप्रमाणे ही संघटना सेलआधारित गुप्त रचना वापरते. या महिला गटांना भरती, संदेश पोहोचविणे आणि निधी गोळा करणे यासाठी तयार केले जात आहे. पुरुष सहकार्यांना त्या लॉजिस्टिक साहाय्य देतात आणि कुणाच्या लक्षात येणार नाही, अशा प्रकारे कार्य करतात. ‘जमात-उल-मुमिनात’चे साहित्य, डिझाईन आणि धार्मिक भाषाशैली या सर्व गोष्टी, पाकिस्तानातील अल-मुहाजीरात आणि बहावलपूरमधील मरकज उस्मान-ओ-अली यांच्या प्रकाशनांशी साधर्म्य साधतात. महत्त्वाची बाब म्हणजे, सिंदूर लष्करी कारवायांच्या दरम्यान उद्ध्वस्त झालेली ठिकाणे पाकिस्तानने पुन्हा बांधणे चालू केले असून फंड जमवणे, ईझीपैसा (एरीूझरळीर)द्वारे ऑनलाईन पैसासुद्धा मिळवायला सुरुवात केली आहे. ३१३ नवे मरकझ तयार करण्यासाठी ३.९१ अब्ज उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एकूणच, ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जिव्हारी लागलेला घाव किती खोलवर गेला होता, याची आपल्याला कल्पना येते. ‘जैश-ए-मोहम्मद’च्या भारतविरोधी कारवाया