У нас вы можете посмотреть бесплатно Balbharati Geet | Avadhoot Gupte | Vaishali Samant | Ekvira Music или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#ChildrensSong #Balgeet #KidsMusic #EducationalSong #vaishalisamant #avadhootgupte #balbharati लहानपण आठवलं की शाळा .. शाळा आठवली की दप्तर .. आणि दप्तर आठवलं की त्यातलं बालभारतीचं पुस्तक! ‘ब्यूटिफुल माईंड‘ चित्रपटाप्रमाणे आपण मोठे झालो तरी आपले लहानपणीचे मित्र तसेच राहिलेले.. म्हणजे त्या पुस्तकातली ती चित्रं! शालेय वर्ष बदलायचं.. मे महिन्याच्या सुट्टीनंतर जूनच्या पहिल्या पावसा बरोबरच पुढील इयत्तेतील आठ दहा कोऱ्या पुस्तकांचा गठ्ठा हातात पडायचा. पण पहिला हात जायचा तो मात्र बालभारतीच्या पुस्तकाकडे. ते उघडून अगदी फुफुसांपर्यंत खोल घेतलेला वास अजूनही माझ्या घ्राणेंद्रियांना स्पष्टपणे जाणवतो. सगळ्या पुस्तकांना खाकी कव्हरं घालायची आईची सक्ती असायची. पण नेमकं बालभारतीच्या पुस्तकातचंच कव्हर ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत कसं काय फाटायचं?.. काही ठाऊक नाही बुवा! 😜 कारण असायचं ते चित्रातले मुलगा मुलगी. किती जवळचं नातं होतं त्यांच्याशी! दरवर्षी पुढच्या इयत्तेत वेगवेगळ्या रंगांच्या कोंदणात भेटणाऱ्या त्या दोघांशी जुळलेल्या नात्याची तुलना.. त्या भावनांचा ओलावा.. आता आम्ही दरवर्षी रंग बदलत येणाऱ्या आयफोनच्या पुढील व्हर्जनस् मधे शोधत रहातो.. पण तो सापडत नाही. म्हणूनच जेव्हा बालभारतीचे ‘संस्था गीत‘ अर्थात, कॉर्पोरेट अँथम बनवण्यासाठी जेव्हा संस्थेच्या श्री किरणजी केन्द्रेंकडून विचारणा झाली, तेव्हा मनातल्या मनात चौथितला अवधूत शाळेच्या रस्त्यावर चिखलात पार थयथयाट करत नाचू लागला. त्याला आवरतोय नं आवरतोय तोच कविराज दासू वैद्यांचे शब्द हाती पडले.. आणि ते मराठी शिकवणाऱ्या आंबेकर बाईंच्या आवाजात ऐकू येऊ लागले. त्याला चाल ती काय द्यायची? गायन शिकवणाऱ्या मगदूम बाईंनी ते कसं गायलं असतं? असा विचार केला आणि झाली चाल तयार! कसं गायचं ते वैशालीला सांगायची गरजच पडली नाही. कारण, तिच्याही नाकात तो बालभारतीच्या पुस्तकाचा वास अजूनही ताजा असावा! तीच गत झाली संगीत संयोजक अनुराग गोडबोलेची. हं.. वर्षाताई भावेंच्या कलांगणची मुले मात्र खूपच कॉम्प्लेक्स देऊन गेली. माइक वर गेल्या गेल्या पाचव्या मिनिटाला जेव्हा त्यांनी चाल शंभर टक्के योग्य गायली, तेव्हा वाटलं की जरा मेहनत करून अजून अवघड करायला हवी होती. 😆 असो! गाणं कसं झालंय ते नक्की कळवा. कानांना कसं वाटलं हे महत्त्वाचं नाही.. नाकात तो बालभारतीच्या पुस्तकाचा वास जाणवला का ते सांगा. धन्यवाद!! 😊 ------------अवधूत गुप्ते विशेष आभार- श्रीमती अनुराधा ओक (संचालक, बालभारती) विशेष आभार- श्री. किरण केंद्रे ( कार्यकारी संपादक, किशोर बालभारती) 🎧 Listen to "Balbharati Geet" on: ➔ Spotify: https://open.spotify.com/album/1omW8k... ➔ Apple Music: / balbharati-geet-single ➔ YouTube Music: • Balbharati Geet ➔ Jio Saavn: https://www.jiosaavn.com/s/song/marat... ➔ Amazon Music: https://music.amazon.in/albums/B0GKBG... ➔ Gaana: https://gaana.com/song/balbharati-geet 📲 Follow Ekvira Music for more updates and new releases: ➔ Instagram: / ekviramusic ➔ Facebook: / avadhoot.gupte.35 ➔ X: https://x.com/EkviraMusic ➔ YouTube: / @ekviramusic Audio Credits- गायिका - वैशाली सामंत कवी - दासू वैद्य संगीतकार - अवधूत गुप्ते विशेष सहाय्य - गुरु डॉ. वर्षा भावे (कलांगण, मुंबई. बाल गायक समूह) https://www.kalangan.org Chorus - बाल गायक समूह ईवा जोशी, अन्वय साळवी, सौम्या क्षीरसागर, रिद्धीमा चव्हाण, सई जहागीरदार, स्वरा पाटील, निआ धुरू, स्मयन आंबेकर, वेदांत यादव, अक्षत शर्मा संगीत संयोजन - अनुराग गोडबोले ध्वनी मुद्रण - आजीवासन स्टूडियो ध्वनिमुद्रक - अवधूत वाडकर ध्वनी मिश्रण - चिन्मय हुल्याळकर सहाय्यक शिक्षक - अथर्व कंठी दीप्ती आंबेकर Video Credits - Animation By - Art Garage Studios, Pune Concept Art & Visual Design - Aniket Baravkar, Dnyanada Gorawade, Aaditya Shivapurkar