У нас вы можете посмотреть бесплатно अन्नमाता ममताबाई भांगरे यांची परसबाग | Gavakadche Vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सामाजिक संदेश देणारी व जनजागृती करणारी परसबाग दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी देवगाव ता.अकोले जि.अ.नगर येथे अन्नमाता सौ. ममताबाई भांगरे यांची परसबाग बघण्याचा योग आला. तसं परसबाग बघणे हे निमित्त होते, त्यांना भेटण्यासाठीच खरेतर गेलो होतो. त्यांची परसबाग सर्वश्रुत झालीच आहे तरिही या वर्षी तेथील गावठी भोपळा हे सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले आहे. केवळ हा भोपळा पाहण्यासाठी आणि त्याचे बी मिळविण्यासाठी हजारच्या वर पर्यटक या ठिकाणी येऊन या दुधी भोपळ्या सोबत फोटो काढून गेले आहेत. मीही मग त्यात एका फोटोची भर पाडली. सेंद्रीय शेती आणि देशी बियाणांचे संकलन या संकल्पनेतून ही परसबाग उभी राहिली आहे. बाएफ संस्थेच्या सहकार्याने देशी बियाणांचे संकलन, संवर्धन व पुनर्निर्मिती अन्नआता म्हणून ओळख असलेल्या सौ. ममताबाई देवराम भांगरे या परसबागेत करत आहेत. या परसबागेची विशेष ओळख म्हणजे धान्यांची रांगोळी व त्यातून दिला जाणारा सामाजिक संदेश. प्रत्येक सण, उत्सवाच्या वेळी येथे धान्यांची रांगोळी काढली जाते व त्यातून काहीतरी सामाजिक संदेश देण्यात येतो. या रांगोळीसाठी सौ.जिजाबाई मधुकर भांगरे या नेहमीच नवनवीन कल्पना घेऊन येत असतात. त्यांना यापुर्वी रांगोळीतले अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. या वेळचा विषय होता स्विप कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृती. मा. सविता कचरे मॅडम (स्वीप नोड अधिकारी, अकोले) यांनी सौ. ममताबाई भांगरे व सौ. जिजाबाई भांगरे यांना ही कल्पना सांगितली व त्यातून साकारली एक आगळी वेगळी धान्यांची रांगोळी. या रांगोळीतून मतदान करण्याबाबत संदेश देण्यात आला. #परसबाग