У нас вы можете посмотреть бесплатно विकास पथावर बोरगाव बुद्रुक / डॉ. कैलास प्रभाकर काळे, उपसरपंच बोरगाव बु. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जनविकास पथावर बोरगाव बु. बोरगाव बुद्रुक एकेकाळी राष्ट्रकूट घराण्याची राजधानी असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील लातूर-बार्शी या मुख्य रस्त्यावरील अवघ्या २७ किमी अंतरावर असणारे रस्त्याच्या दुतर्फा वसलेले गाव. प्रामुख्याने व्यापारी शहर असणाऱ्या लातूरशी आपली नाळ जोडली गेल्यानं गावाचे अनेक व्यवहार लातूरवर अवलंबून आहेत. परंतु गावाने आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत मागच्या ५ वर्षात केलेली कामे ही गावच्या लोकांना प्रगती पथावर नेणारी आणि गावाची नवीन ओळख निर्माण करणारी अशीच ठरली आहेत. पाच वर्षांपूर्वी मुख्य रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गावात साधी पुरेशी लाईटची सोय नव्हती, पिण्याच्या पाण्याचे नळ तर सोडा पाणी पुरवठयाची सोय कोलमडलेली होती, गावचा मुख्य स्रोत असणारे शेतकरी योजनांपासून दूर तर मागास वस्त्या छपराविना ओस पडल्या होत्या. पाच वर्षांपूर्वी गावचे सुपुत्र डॉ कैलास प्रभाकरराव काळे यांनी बोरगाव बुद्रुकच्या विकासाचा पाया रचला त्याला बोरगावच्या जनतेने खंबीर साथ दिली आणि आज डॉ कैलास काळे यांच्या कल्पनेतून बोरगाव बुद्रुकचा चेहरा मोहरा बदलला आहे. पाच वर्षांपूर्वी अंधारात असणाऱ्या बोरगाव बुद्रुकने कात टाकली असून गावात बघेल तिकडे पथदिवे आणि हायमास्क सारख्या उंच टॉवरने चौक प्रकाशाने न्हाऊन निघाले आहेत. आज गावात ३३ केवी चे सबस्टेशन आहे. तर गावकऱ्यांसाठी सिंगल फेजच्या ३ डीपी बसवण्यात आले आहेत. कोणत्याही देशाची प्रगती हि त्या देशाच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासावर अवलंबून असते आणि ग्रामीण भागाचा विकास गावातील संसाधने, शेती, रस्ते, शिक्षण, आरोग्य यावर अवलंबून असते हा धागा पकडत डॉ कैलास काळे यांनी गावातील लोकांना विश्वासात घेत गावाच्या हक्काचे पाण्याचे सोर्स मजबूत केले. पिण्याच्या पाण्याची नळाद्वारे घरपोच सोय व्हायला पाहिजे यासाठी गावातच विहीर घेतली. गावातील तलावाचे खोलीकरण केले. शिवाय ज्या भागात हे पाणी पोहचणार नाही, गावाच्या अश्या विविध भागात ५ बोअर घेऊन गावाच्या लोकांना नळाद्वारे घरपोच पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. लहान मूल हे उद्याचे भविष्य आहे पिढी सुधारली तर गाव सुधारेल या धर्तीवर गावातील ६ अंगणवाड्या सक्षम बनविण्यात आल्या आहेत. त्यात ३ अंगणवाड्यांच्या नवीन इमारती त्यात आलेले डिजिटल साहित्य या अंगणवाडयांना मिळालेला ISO मानांकन हि बोरगाव बुद्रुकची नवी ओळख निर्माण करतो. गावात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे सुशोभीकरण, शिवाय संगणक आणि अद्ययावत डिजिटल शाळा बनविण्याचे काम, सोबतच शाळेलगत खो-खो हॉलीबॉलची मैदाने बनवून गावाची पिढी शिक्षणासोबतच मैदानी खेळात अग्रेसर राहावी हि भावना जोपासली जात आहे. गावात विविध समाजासाठी स्मशानभूमी राहावी या संकल्पनेतून गावातील मातंग समाजासाठी स्मशान भूमीच्या जागेचे आरक्षण केले, शिवाय लिंगायत स्मशान भूमीला संरक्षण भिंत बांधली इतर स्मशान भूमीचे सुशोभीकरण करण्यात आले. गावात विविध महापुरुषांचे पुतळे सुशोभीकरण, चौक सुशोभीकरण, समाज मंदिर, हनुमान मंदिर यासह इतर कामे प्राधान्याने सुरु आहेत. गावच्या प्रगतीत मोठा टप्पा ठरणारी जलजीवन मिशन अंतर्गत २ कोटी १५ लाखाची नवीन पाणी पुरवठा योजना गावाला लाभली असून, यातून २ लाख लिटर पाण्याची टाकी गावात उभारली जाणार आहे. विरंगुळा केंद्र, सांस्कृतिक सभागृह याची कामे सुरु असून, गावाला प्रगतीचे नवे पंखच जणू पाचवर्षात आले आहेत. बोरगाव बुद्रुक ओळखले जाते येथील खंडोबाच्या यात्रेमुळे, शिवाय दत्त जयंतीमुळे, दर्ग्यातील उर्स असे गावात होणारे विविध उत्सव माणसाची मने जोडणारी ठरत आहेत. गावाने मागील ५ वर्षे एकच तंटामुक्ती अध्यक्ष बिनविरोध नेमून गावातील गुन्हेगारी शून्यावर आणलीय तर तब्बल ४ वर्षे गावात दारूबंदी करून गावाला वेगळ्या वळणावर नेण्याचे काम हि या पाच वर्षातच घडले आहे. यामुळे गावातील माता भगिनी आनंदाने या निर्णयाचे स्वागत करीत आहेत. ग्रामपंचायत गावची कामे करते परंतु तेथील कर्मचाऱ्यांचा सन्मान त्यांना राहणीमान भत्ता देणारे बोरगाव बुद्रुक एकमेव ठरले आहे. गावाच्या प्रगतीचे हे पंख पक्के होत असून, गावात मकरसंक्रांतीचा गोड कार्यक्रम राबवणारे हि बोरगाव बुद्रुक हे लातूर जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करते. शिवाय गावातील प्रतिष्ठित शेतकरी, शिक्षक व इतर क्षेत्रातील मान्यवर यांचा सन्मान, आरोग्य शिबिर, अपंगांना साहित्य वाटप, मुलींना सायकल वाटप, अशा एक नव्हे अनेक कार्यक्रमाची रेलचेल बोरगाव बुद्रुकने गत पाच वर्षात अनुभवले आहेत. आता गाव नव्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी सज्ज झालाय डॉ कैलास काळे यांनी गावात नवे ग्रामसचिवालय, बसस्थानक, व्यापारी संकुल, मंगल कार्यालय उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या संकल्पनेसाठी गावकरी सज्ज आहेत. बोरगाव बुद्रुक पुन्हा प्रगतीच्या नव्या वाटेवर, आपली ओळख पक्की करीत गावच्या विकासासाठी प्राधान्य देईल हे नक्की.