У нас вы можете посмотреть бесплатно केरळ मधील पहिला दिवस | किती खर्च आला | 1st day in kerala | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तर हे आहे केरळ. God's own country. इथे जाण्यासाठी चा मला आलेला खर्च, मी घेतलेल्या package चा खर्च, इथे जाण्यासाठी लागणारा ट्रेन/flight चा खर्च हे सगळे मी या video मध्ये तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा हा Video शेवट पर्यंत नक्की बघा. केरळ ला जाण्याची माझी खूप वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली. इथला climate, लोक , culture याची मला आधीपासूनच ओढ होती. त्यामुळे या राज्याचे मला विशेष आकर्षण होते. आणि आज इथे गेल्यावर या राज्याच्या प्रेमात पडली आहे मी. आणि मला खात्री आहे की वीडियो च्या शेवटी तुम्हीही या राज्याच्या प्रेमात पडल्या शिवाय राहणार नाही. सुरवाती पासून सांगायचे झाले तर मला आधी train ने घाटकोपर पर्यंत जावे लागले. टिकिटाचा खर्च 30 रुपये इतका आला. आता तुम्ही कोणत्या स्टेशन वरुन येणार आहात त्यावर हा खर्च अवलंबून आहे. तिथून private रिक्षा करून मी एयरपोर्ट ला पोहोचले. घाटकोपर पासून T2 टर्मिनल पर्यंत साधारण 150 ते 200 रू खर्च आला. एयरपोर्ट ला पोहोचल्यावर काय procedure करावी लागते. तुम्ही जर मुंबई एयरपोर्ट वरुन जाणार असाल तर departure ला कुठे जावे. काय करावे काय करू नये हा detail मध्ये video आपल्या मराठी बांधवांसाठी लवकरच घेऊन येणार आहे जेणेकरून कोणी पहिल्यांदा विमानाने जात असेल तर गोंधळून जाऊ नये म्हणून. तर तुम्हाला तो video पाहायला आवडेल का comment करून नक्की सांगा. तर अश्या प्रकारे सर्व procedure करून आम्ही केरळ च्या कोची विमानतळावर पोहोचलो. उतरल्यावर आम्ही book केलेल्या package नुसार आमचे ड्राइवर तिथे वेळेच्या आधीच हजर होते. 2 वेळेस call केला त्यांनी पण आमच्या bags alya नव्हत्या त्यामुळे थांबावे लागले. तिथेही माझा timepass चालूच होता. Bags घेऊन आम्ही प्रवासाला सुरवात केली सर्व प्रथम आम्ही कोची मधील furniture मार्केट बघितले. खूप सकाळी उतरल्यामुळे बहुतेक दुकाने बंद होती. आम्हाला कोची to munar असा पल्ला गाठायचा होता परंतु खूप भूक लागल्यामुळे सर्वात आधी हॉटेल गाठले. आणि हॉटेल गाठल्यावर मला सर्वात पहिला धक्का बसला इथले rates बघून. कसं तरी सावरत पुढचा प्रवास चालू केला. पुढे गेल्यावर एका adventurous ठिकाणी ते आम्हाला घेऊन गेले. तिथे zip lining, sky cycling, giant swing अश्या सगळ्या activities केल्या. त्याचा खर्च 1500/- इतका आला त्यात तुमच्या सर्व adventurous activities आणि तुमचे त्यांच्याकडून काढण्यात येणारे फोटो आणि video सुद्धा included असतात. पुढे एका हैंडलूम साडी च्या दुकानात त्यांनी आम्हाला नेले. तिथे अश्या पद्धतीने साडी आणि साऊथ इंडियन लुंगी ज्याला मुंडू बोलतात ते हाताने तयार केले जाते. तिथे साऊथ इंडियन साडी घेण्याचा मोह मला आवरला नाही आणि एक साडी घेऊन टाकली. पुढे माझ्या weakest point म्हणजे chocolate factory दाखवण्यासाठी ते घेऊन गेले. केरळ मध्ये coco चे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असल्याने तिथे भरपूर chocolate factories आहेत. जिथे chocolate कश्या प्रकारे तयार केले जाते ती प्रोसेस दाखवली जाते. पुढे आम्ही एका आयुर्वेदिक plantation मध्ये गेलो. जिथे वनस्पती पासून आयुर्वेदिक औषधे तयार केली जातात. इथे video काढायला सक्त मनाई आहे. पण त्यांची permission घेऊन आम्ही थोडे फार video काढू शकलो. तिथून पुढे आम्ही एक जंगल सफारी बाय जीप बुक केली त्यात आम्हाला waterfall, hanging bridge, eco point आणि sunset point दाखवण्यात आला. या ride वर जाणारा रस्ता इतका रोमांचक होता की ते म्हणतात ना, मंजिल से ज्यादा रास्ते खूबसूरत होते है. तसाच काहीतरी feel येत होता. याचा खर्च 4000 सांगितला होता पण बार्गेनिंग करून आम्ही त्याला 3500 पर्यंत आणले. जर तुम्ही grop ने जाणार असाल तर ही ride तुमच्यासाठी खूपच reasonable ठरेल. कारण तुम्ही जीप एका व्यक्तीसाठी book करा किंवा group साठी खर्च सेम च येतो. तिथून direct त्यांनी आम्हाला हॉटेल ला सोडले. थोड फ्रेश होऊन आम्ही थोड जेवण केलं आणि आराम केला कारण आम्ही munar ची फक्त एकच साइड बघितली होती. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून munar ची दूसरी साइड explore करायची होती. तर हा आमचा पहिल्या दिवसाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला नक्की comment मध्ये सांगा आणि video like share करायला विसरू नका. भेटूया पुढच्या video मध्ये तो पर्यंत स्वतः ची काळजी घ्या आणि फिरत रहा. #beutifull #beuty #bollywood