У нас вы можете посмотреть бесплатно धक्कादायक! सोलापुरात विवाहितेचा क्रूर छळ; मारहाण करत सक्तीने केला गर्भपात или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
धक्कादायक! सोलापुरात विवाहितेचा क्रूर छळ; मारहाण करत सक्तीने केला गर्भपात! सोलापूर: माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना सोलापूर शहरात उघडकीस आली आहे. एका २२ वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींनी केवळ शारीरिक आणि मानसिक छळच केला नाही, तर तिला जबरदस्तीने गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. पती आणि सासऱ्यांच्या अमानुष मारहाणीत या महिलेच्या पाठीच्या कण्यात गाठ झाली असून, सद्यस्थितीत ही पीडिता गंभीर दुखापतीट आहे. शनिवार पेठ येथील रहिवासी सिमुनम हिचा विवाह होटगी रोड परिसरातील मो. माज चांदा याच्याशी झाला होता. मात्र, सुखाचा संसार करण्याऐवजी सासरच्या नराधमांनी तिचा छळ सुरू केला. सिमुनम गरोदर असताना, सासरच्यांनी तिला बळजबरीने औषधे खायला लावून तिचा गर्भपात घडवून आणला. एका मातेचे मातृत्व हिरावून घेण्याचे पाप सासरच्यांनी केले. पती आणि सासऱ्यांनी तिला इतकी बेदम मारहाण केली की, तिच्या पाठीच्या मणक्यात गंभीर दुखापत होऊन तिथे गाठ निर्माण झाली. प्रकृती खालावल्यानंतर सासरच्यांनी तिला माहेरी सोडून दिले. तिच्या वडिलांनी पदरमोड करून तब्बल १२ लाख रुपये खर्चून मुंबईत उपचार केले, मात्र सासरच्यांना पाझर फुटला नाही. याप्रकरणी सिमुनमने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची चक्रं फिरवली आहेत. लग्नात दिलेले दागिने, शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्वतःकडेच ठेवून घेत तिला घराबाहेर काढणाऱ्या ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १. पती - माज चांदा २. सासरे - अस्लम चांदा ३. सासू - तहसीन चांदा ४. नणंद - तहमीम ५. नणंदेचा पती - हबीबउल्ला ६. मामे सासरे - अल्ताफ कुमठे ७. मामी सासू - जसमीम कुमठे 8. 8 शाहनवाज "विद्येच्या आणि संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या समाजात आजही एका विवाहितेचे कुंकू आणि तिचे मातृत्व ओरबाडणारे नराधम मोकाट आहेत. सिमुनमची ही अवस्था करणाऱ्यांना कायद्याचा असा तडाखा मिळायला हवा की पुन्हा कोणा लेकीच्या वाट्याला असा वनवास येणार नाही!"