У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Dada Sharad Pawar, दोघांचाही एकनिष्ठ, रांगडा मंत्री गोत्यात का? Story Dot Com | Narhari Zirwal или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#narharizirwal #ajitpawar #sharadpawar #storydotcom २०१९ च्या सत्ता प्रयोगावर लिहिलेल्या चेकमेट या पुस्तकात वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी लिहितात, की अजित दादांनी पहाटेच्या शपथविधीची तयारी केल्यानंतर मुंबई विमानतळावर ३८ आमदारांना भाजपची सत्ता असलेल्या हरियाणातील गुडगावच्या रिसॉर्टवर नेण्यासाठी सात विमानं सज्ज ठेवली होती. स्वतः पार्थ पवार आणि भाजपचे प्रविण दरेकर या नियोजनाची काळजी घेत होते. पण जेव्हा आमदारांना कळायला लागलं की हे शरद पवारांच्या परवानगीशिवाय होतंय तेव्हा प्रत्यक्षात सात ऐवजी फक्त एकच विमान उडालं ज्यात चार आमदार होते. त्या चार आमदारात एक होते ते नरहरी झिरवळ. या आमदारांना दिल्लीतले राष्ट्रवादीचे युवा नेते सोनिया दुहान आणि धीरज शर्मा यांनी सोडवून आणलं त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांसोबत त्यांची हॉटेलातच झटापट झाली. या झटापटीत नरहरी झिरवळांवर हल्ला झाला. प्रचंड रक्तस्राव होत असलेल्या झिरवळांना आधी पवारांचं दिल्लीतलं निवासस्थान सहा जनपथ आणि तिथून मुंबईत आणलं, जिथे स्वतः शरद पवार या सगळ्यांची वाट पाहत होते. पवारांनी सगळ्या आमदारांना सोबत घेऊन जी पत्रकार परिषद केली त्यात नरहरी झिरवळ या अशा अवघडलेल्या परिस्थितीत उभा होते. नरहरी झिरवळांचा हा किस्सा त्यांची पवारांवरची निष्ठा यासाठी दाखवतो की त्यांनी एकीकडे अजित दादांचंही मन राखण्यासाठी दिल्ली गाठली होती, पण दुसरीकडे जेव्हा जाणिव व्हायला लागली की शरद पवार या सगळ्यांवर भारी पडतायत तर नरहरी झिरवळ पुन्हा माघारी परतले. हे तेच नरहरी झिरवळ आहेत जे सर्वात पहिले मंत्री होते ज्यांनी अजित दादांना अखेरचा निरोप दिला त्याच जागेवरुन सांगितलं की आता दोन्ही राष्ट्रवादी एक व्हायला पाहिजेत. नरहरी झिरवळांच्या या वक्तव्यानंतर पवार गटातल्या नेत्यांनी तर विलिनीकरणाच्या बैठकाही झाल्या असल्याचे पुरावे दिले. पण इकडे झिरवळांच्याच पक्षातल्या वरिष्ठांना काय हे मत पटलेलं नव्हतं. अशातच बातमी आली की नरहरी झिरवळांच्या मंत्रालयातील दालनातील क्लर्क लाचलुचपत विभागाच्या ट्रॅपमध्ये अडकलाय आणि यात झिरवळांचाही संबंध जोडला गेला. एका अधिकाऱ्याच्या लाचखोरीचा संबंध जोडला गेल्यानंतर नाराज झालेल्या झिरवळांनी सांगितलं की यात जर संबंध आढळला तर राजीनामा देईल. या घडामोडीनंतर झिरवळांनी सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ते नॉट रिचेबल झाले.. पण ज्या झिरवळांनी एकत्र येण्याची भावना बोलून दाखवली त्या झिरवळांचा कुणी गेम करतंय का, यामागे खरंच काही षडयंत्र आहे का त्याचीच स्टोरी मी या व्हिडीओत सांगणार आहे.. Join this channel to get access to perks: / @storydotcomofficial Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook - / officialstorydotcom Instagram - / officialstorydotcom X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...