У нас вы можете посмотреть бесплатно Berang Chaukat| Shortfilm| Geetanjali Jadhav| Actor или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
२०१४ मध्ये मी अभिनेत्री म्हणून काम केलेली ही शॉर्टफिल्म आज २०२६ मध्येही अनेक महिलांना जवळची वाटते , ह्या लघुपटातील स्त्री कुठेतरी आपल्या आसपासच आहे असं वाटतं. काळ कितीही बदलला तरीही भारतीय विवाहसंस्था, त्यासोबत येणारी आपली समाजव्यवस्था आणि ह्या सगळ्यात स्वत:च अस्तित्व टिकवून ठेवण्याची बाईची लढाई आणि अखेर समर्पण ही वर्षानुवर्षे नकोशी होऊनही नव्याने दिसणारी बाईची व्यथा.! काही जाणकारांनी ही शॉर्टफिल्म पाहिल्यानंतर आजही समाजात बऱ्याच ठिकाणी हे चित्र बघायला मिळतं ही प्रतिक्रिया देणं धक्कादायक होतं . त्यामुळे आजच्या महिलादिनी ही शॉर्टफिल्म माझ्या त्या सर्व मैत्रिणींना समर्पित, ज्यांनी चौकटीतल्या आयुष्याचा आनंदाने स्वीकार करूनही, नियतीने मनमुराद जगण्याचे त्यांचे सर्व मार्गच रंगहीन करून टाकले. ही शॉर्टफिल्म पूर्ण झाल्यानंतरची आमच्या टीमची पहिली प्रतिक्रिया म्हणजे, कुठल्याही समाजमाध्यमांवर ही फिल्म प्रदर्शित करण्याची वेळ येऊ नये अशीच होती. तरीही आज ही फिल्म बघून तुम्हाला नक्की काय वाटलं, ह्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा. न जाणो नकळतपणे त्यानिमित्ताने काहींना मोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी मिळेल..