У нас вы можете посмотреть бесплатно युवा दर्पण लाईव्ह बातमीपत्र:24/10/25; डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे कारण आले समोर? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मूळची बीड च्या वडवणी तालुक्यातील कोठारबन येथील रहिवाशी आणि सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली महिला डॉ.संपदा श्रीकृष्ण मुंडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक समोर आलीय .या घटनेनें बीड जिल्हयासह फलटण येथील त्यांचे सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरलीय,डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. मृत डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळलीय त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की,PSI गोपाल बदने यांने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला,तर पोलीस प्रशांत बनकर यांनी मला सतत मानसिक त्रास दिला.गोपाळ बदणे हा मूळचा बीडच्या परळी तालुक्यातील रहिवाशी असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात PSI म्हणून कार्यरत आहे, या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून,आरोपी बदने व बनकर या दोघांनाही तडकफडकी निलंबित करण्यात आले असून डॉ. संपदा यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून सुसाईड नोटच्या हस्ताक्षराची तपासणी,तसेच डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या आरोपांची पडताळणी सुरू झाली आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की,चौकशीतील दबाव, प्रशासकीय ताण किंवा वैयक्तिक कारण, हे तपासानंतर स्पष्ट होईल. तूर्तास तरी पोलिस अधिकाऱ्याच्या गैरकृत्य व त्रासाला कंटाळून आणि पोस्टमार्टेम रिपोर्ट मध्ये आवश्यक त्या प्रकारचे बदल करण्याचा एका खासदारांच्या पीएचा राजकीय दबाव या कारणानेच आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला जात आहे .दरम्यान, डॉ. मुंडे यांनी यापूर्वी या प्रकरणी तक्रार करून त्यात माझ्यावर अन्याय होत आहे, मला आत्महत्या करावी लागेल,असे त्या पत्रात नमूद केले होते. मात्र, त्यांच्या या पत्राची दखल घेतली गेली नसल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. दरम्यान वैद्यकीय संघटनांनी व डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत,दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.