У нас вы можете посмотреть бесплатно पडद्यापलीकडचा सुबोध | Full Episode | FT. Suresh Bhave & Snehal Bhave или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
एखादा नट हा त्याच्या कलेने सर्वश्रुत होतो. त्याची कला, त्याचे सादरीकरण त्याला सिनेमागृहातून, थेट प्रेक्षक वर्गाच्या मनांत उत्तुंग असे स्थान देऊन जाते.. तो सतत आपल्या कलेत एक नाविन्यता आणत तिला उजळवत जातो, अगदी! चंदनापरी! असाच एक मराठी सिनेसृष्टीस लाभलेला नट म्हणजे सुबोध भावे.. सतत प्रयोगशील असणे हा त्यांचा विशेष गुण.. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बालगंधर्व, लोकमान्य यांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारून, त्यांना पुन्हा जिवंत करणारा अभिनेता.. कट्यार काळजात घुसली संगीत नाटक विसाव्या शतकात, रंगभूमीवरून, सिनेमाच्या रूपांत घरोघरी पोहचवण्यात यांचे खूप मोठे योगदान.. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, मराठीतील पहिलेवहिले सुपरस्टार यांचे जीवन चरित्र तर पुन्हा मराठी सिनेमांना हाऊसफुल्ल ची पाटी लावून गेलेत.... ७० हून अधिक सिनेमे करत मोठ्या पडद्यावर यशाच्या शिखरावर विराजमान असतांना सुध्दा! छोट्या पडद्यावर पुन्हा तुला पाहते रे सारखी मालिका करून, ती यशस्वी करणारा नायक... असा हा अभिनेता,नाटककार, दिग्दर्शक, निर्माता, लेखक या सर्वांचा सुवर्णमध्य आणि जीवनपटाचा बादशाहा !! ज्याने एक ध्यास घेतला, एक स्वप्न पाहिलं, त्यासाठी प्रचंड मेहनत केली, कष्ट घेतले. चिवटपणे संघर्ष करत राहिला. तो पुढे जातच राहिला. कामावरची श्रद्धा व उत्कृष्टाचे ध्येय यांनी त्याला भरभरून यशही दिले. पण त्याने तो थंडावला नाही. मुळात यशाला न मानता सतत प्रगतशील राहणे हेच मानणारा हा कलाकार. तेवढ्याच ताकदीने व ऊर्जेने तो आजही वेगाने वाटचाल करत आहे, आपल्या सभोवतालच्या माणसांना आपल्या कृतींतून व आपलेपणातून प्रेरित करत आहे. पडद्यावरचा कलाकार सुबोध असाच आहे, आपल्या चाहत्यांना त्याच्या कलेने अगदी सर्वश्रूत असणारा,पण असं काही अजूनही भावेंच्या बाबतीत नक्कीच आहे, जे कुठेतरी चाहत्यांना ठाऊक नाही... आणि तेच सांगण्यासाठीचा हा प्रयत्न पडद्यापलीकडचा सुबोध