У нас вы можете посмотреть бесплатно शिवनेरी, सोलापूर,कोल्हापूर आणि संभाजीनगरमधील शिवजयंतीचे व्हिडीओ | Shivjayanti 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Shivjayanti2026 #ShivneriShivjayanti #MaharashtraShivjayanti2026 शिवजयंतीच्या निमित्ताने शिवजन्मभूमी जुन्नर येथील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या समोर बरोबर रात्री 12 वाजता छत्रपतींना फायर शो द्वारें अनोखी मानवंदना देण्यात आली.यावेळी शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला.यावेळी संपूर्ण परिसर अवघ्या भगव्या रंगाने न्हाऊन गेला होता.आकाशात विविधरंगी रंगांची उधळण झाली होती.हा सगळा चित्तथरार क्षण शिवप्रेमींनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे बुधवारी मध्यरात्री बरोबर १२ वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत क्रांती चौक परिसर भगव्या झेंड्यांनी आणि आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता. घड्याळाचे काटे १२ वर पोहोचताच घोषणांचा निनाद सुरू झाला आणि भव्य आतषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला. यावेळी तरुणाईसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. क्रांती चौकातील या दिमाखदार प्रारंभामुळे शिवजयंती महामहोत्सवाची शहरात जल्लोषमय सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवमय झाला.हजारो शिवभक्त महिलांनी एकत्र येत ‘न भूतो न भविष्यती’ असा भव्य आणि शिस्तबद्ध शिवजन्मोत्सव साजरा करत आपल्या लाडक्या राजाला मानवंदना दिली.पारंपरिक नऊवारी साड्या, फेटे आणि भगवे दुपट्टे परिधान केलेल्या महिलांनी परिसर भगवामय करून टाकला.रात्री दहापासूनच चौकात महिलांची गर्दी उसळू लागली होती.चौकापासून एसटी स्टँड, पुणे नाका आणि नवी पोलीस चौकीपर्यंत महिलांची अभूतपूर्व उपस्थिती पाहायला मिळाली.अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी राजमाता जिजाबाईंचा पुतळा आणि समोर आकर्षक सजवलेला पाळणा ठेवण्यात आला होता.पाळण्यात बाळशिवबांची मूर्ती विराजमान होताच वातावरण भक्तीभावाने दुमदुमून गेले.‘झुलवा पाळणा… पाळणा बाळ शिवाजीचा’ या गीतावर हजारो महिलांनी टाळ्यांच्या गजरात जल्लोष केला.गुलाब पाकळ्यांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय जिजाऊ-जय शिवराय’, ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित हा पाळणा सोहळा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडला.वीरपत्नी, विविध क्षेत्रातील मान्यवर महिला आणि महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते पाळणा सोहळा संपन्न झाला. #MHT038 #MHT026 #MHT005 #MHT025 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.