У нас вы можете посмотреть бесплатно देवघळी कशेळी बीच | कोकणातील एकमेव फॉरेनचा बीच | BEST BEACH IN KOKAN | DEVGHALI KASHELI BEACH | KOKAN или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
देवघळी कशेळी बीच | कोकणातील एकमेव फॉरेनचा बीच | BEST BEACH IN KOKAN | DEVGHALI KASHELI BEACH | KOKAN @SusaatExpress2025 नमस्कार मित्रानो, या विडिओ मध्ये मी तुम्हाला कोकणातील एक असा बीच दाखवला आहे, जो अगदी फॉरेनच्या बीचच्या वाइब्स देतो. हा बीच हल्ली काही वर्षांमध्ये जास्त प्रसिद्ध होत आहे. अगदी अलिबाग पासून ते गोव्यापर्यंत असंख्य बीच आहेत. पण प्रत्येक बीचचे थोडेफार वेगळेपण सोडले. तर बऱ्याच बाबतीत समानता आहे. म्हणजे बघा ना, लांबलचक पसरलेला रुपेरी वाळूचा किनारा, त्यावर दूरवर पसरलेली माडाची , सुरुची किंवा केतकीची बने, आणि त्या किनाऱ्यावर मोठा आवाज करत धडकणाऱ्या लाटा. म्हणजे थोड्या अधिक फरकाने सर्वच बीच या प्रकारचे असतात. पण हा बीच युनिक आहे, इथे इतर बीच प्रमाणे सरळसोट पायवाट नाही , तर उंच कड्यावरून खाली उतरून या बीचकडे जावे लागते, इतर बीच प्रमाणे अजिबात लांबलचक नाही, एकदम छोटा बीच, तिन्ही बाजूने डोंगराने आणि काळ्या पाषाणांनी वेढलेला आणि फक्त एका बाजूने समुद्र. मधेच डोंगराचा थोडा पुढे आलेला एक सुळका ज्यावर पर्यटकांसाठी अतिशय सुंदर पॉईंट तयार करण्यात आले आहे. समुद्राचं पाणी तर एकदम नितळ हिरवेगार. जे पाहावयास दुर्मिळच. त्यात अजून एक भर म्हणजे, या बीच च्या एका बाजूस एक घळ निर्माण झाली आहे. त्या घळीच्या मध्यभागी कातळामध्ये एक गुहा आहे. याच गुहेमध्ये सूर्यदेवांची भारतातील एकमेव मूर्ती सापडली होती. बहुतेक या घळी मध्ये देवाची मूर्ती सापडल्यामुळे या भागाला, देवघळी असे नाव पडले असावे. थोडक्यात या बीचवर तोच तोचपणा नसून आपल्याला एक फॉरेनच्या बिचचा अनुभव घेता येतो. तर असा हा एक युनिक आणि अतिसुंदर बीच तुम्हाला या विडिओ मध्ये पाहावयास मिळेल तर तुम्ही आताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा असे इंटरेस्टिंग विडिओ पोस्ट करेन तेव्हा लागलीच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल. @ratnagirikhabardar1905 @ktvnewsratnagiri @ratnagirione1704 @propertyinratanagiri1723 @kokanNgoIndia @KokansadLiveNews @kokansanskruti @KokanNow