У нас вы можете посмотреть бесплатно SATARA | दक्षिण भारतातलं वृंदावन म्हणून प्रसिद्ध असलेली सातारा जिल्ह्यातली गोपाळकृष्णांची गिरवी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#giravi #satara #shreekrishna सातारा जिल्ह्यातल्या फलटणपासून १२ कि. मी. अंतरावर गिरवी नावाचं एक गाव आहे. याच गावाच्या दक्षिणेकडील टोकाला भगवान गोपाळ श्री कृष्णाचं मंदिर आहे. हे मंदिर श्री.देशपांडे यांच्या मालकीचं असून मंदिर व्यवस्थापन श्री.देशपांडे कुटुंबाकडेच आहे. विजापूरच्या आदिलशहाच्या कारकिर्दीत श्री. बाबूराव गोपाळ देशपांडे उर्फ बाबूरावमहाराज यांनी मूळ हे मंदिर बांधलं. हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामात बांधण्यात आलंय. विशेष म्हणजे या मंदिराच्या आवारात नेहमीच हवा खेळते राहते. जसं जसं काळ पुढे सरकत गेला तस तस या मंदिरात अनेक बदल होत गेले. याच दरम्यानच्या काळात या मंदिराला सभामंडप जोडण्यात आला. मंदिराचा इतिहास या मंदिराचा इतिहासही आपण जाणून घेऊ..खरंतर श्री.बाबुरावमहाराज हे भगवान गोपाळकृष्णांचे एकनिष्ठ आणि निष्ठावान भक्त होते. त्याच्याबरोबर मुरलीधराची चांदीची मूर्ती होती व त्याची ते श्रद्धेनं नित्य पूजा करीत. आपल्या गावी गिरवीला भगवान गोपाळकृष्णाची शळिग्राम रूपातील अशीच मूर्ती घडवून मंदिर स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांना मनासारखी शिळा उपलब्ध होत नव्हती. अखेर त्यांना खोदकामातून एक मोठी शिळा प्राप्त झाली. मग यानंतर पुढची आणि सर्वात मह्रत्वाची म्हणजे गोष्ट होती ती म्हणजे योग्य मूर्तिकारांचा शोध घेणे. शर्थीचा प्रयत्न करूनही मूर्तिकार मिळेनात. श्री.बाबुराव यांच्या मानसपूजेसारखीच मूर्ती त्यांना हवी होती आणि ही मूर्ती घडवताना कोठही छेद जाता कामा नये ही अट त्यांनी ठेवली होती. याचदरम्यान दोन मूर्तिकार गिरवीला श्री. बाबूराव यांचा शोध घेत आले व जशी हवी तशी मूर्ती घडवून देण्याची त्यांनी तयारी दर्शवली. परंतु समोरून आलेल्या मूर्तिकारांना पाहून श्री बाबूराव अचंबित झाले. कारण दोघांपैकी एकाला हात नव्हते. तर दुसऱ्याला डोळे नव्हते. लक्षात येताच लगेचच अजिबात काळजी करू नका, हे कार्य आम्ही अपूर्ण ठेवणार नाही, हा एकाच्या दृष्टीने आणि दुसऱ्याच्या हाताने एकत्र काम करू, असे आश्वासन मूर्तिकारांनी श्री बाबुरावांना दिले. अखेर श्री.बाबुरावांनी आपल्याला हव्या असलेल्या मूर्तीचा तपशील मूर्तिकारांना दिला आणि मूर्तिकार कामाला लागले. अखेर डोळयांना दिपवून टाकेल अशी मूर्ती तयार झाली आणि काय आश्चर्य, भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत उभे आहेत. दोन गायी लक्षपुर्वक कान देऊन आणि तल्लीन होऊन त्यांचं बासरी वादन ऐकत आहेत, असे रूप मूर्तिकारांनी साकार केले. परिसराची माहिती मंदिर जेवढं भव्य आहे, तेवढाच भव्य दिव्य या मंदिराचा परिसर आहे. या मंदिराच्या बाजूच्या भागात श्री गणेश , हनुमंत आणि नरसिंहाची मूर्ती विराजित आहे. मंदिराच्या समोरील भागात हरी हर ऐक्य साधणारी प्रतिष्ठित गरुड हनुमंत व शंकर तसेच नंदीची मूर्ती आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांला हे मंदिर आपलंसं करत जणू की काय गोपाळ कृष्णांच्या वृंदावनाची आठवण करून देते.. दर्शनासाठी संपर्क:- 9823049059 कॅमेरा आणि व्हिडीओ संकलन:- किरण गायकवाड देवस्थानाचे अधिकृत युट्युब चॅनेल:- / gopalkrishnagirvi