У нас вы можете посмотреть бесплатно वैज्ञानिकांनी चाकोरीबाहेरचे उपाय शोधावेत-उपराष्ट्रपती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
१६.०८.२०२१ : हवामानबदलापासून ते कृषी आरोग्य क्षेत्रात मानव जातीसमोरच्या आव्हानांवर मात करण्यासाठी वैज्ञानिकांनी चाकोरीबाहेरचे उपाय शोधावेत असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. बेंगलुरु इथल्या जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च इथं वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते. जनतेचं जीवन आनंदी, आरोग्य संपन्न आणि सुखकर करणं हे विज्ञानाचं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी कल्पक उपाय शोधण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशाच्या प्रगती आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीसाठी विज्ञान हा कणा आहे. भारताची मोठी लोकसंख्या लक्षात घेता लहान वयातच मुलांच्या मनात विज्ञानाची गोडी निर्माण करणं आणि जागतिक तोडीच्या वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले. कृत्रिम बुध्दिमत्ता,सिंथेटिक जीवशास्त्र यासारख्या नव्या क्षेत्रातही संशोधन करण्याचं आवाहन त्यांनी वैज्ञानिकांना केलं.