У нас вы можете посмотреть бесплатно संत तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले? How did Saint Tukaram Maharaj go to Vaikuntha? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संत तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले? How did Saint Tukaram Maharaj go to Vaikuntha? #संत_तुकारामांनीकोणता_संदेश_दिला • जगात देव नाही | There is no God in the wor... संत तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले? संत तुकाराम महाराज म्हणतात, जिवंतपणी आई वडिलांना सांभाळा. मृत्यूनंतरचे कोणतेही जीवन नाही. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पिंडदान करणे, तेरवी करणे, केस कापणे, नैवेद्य दाखविणे आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची वाट पाहणे, हा मूर्खपणा आहे, असे संत तुकाराम महाराजांचे मत आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दगडधोंड्यांची पूजा करण्यापेक्षा कुटुंबातील आई-वडील, भाऊ-बहीण, मुलं, पत्नी यांचा आदर-सन्मान करा. गोरगरिबांना मदत करा. शेजाऱ्यांशी प्रेमाने वागा, हे संत तुकाराम महाराजांचे लोककल्याणकारी विचार आहेत. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्ही अंग स्वच्छ कराल, पण अंतकरण स्वच्छ करणारे साबण आहे का? पाणी स्वच्छ नसेल तर महागडे साबण देखील उपयुक्त ठरणार नाही. अंतकरण स्वच्छ करणारे साबण अजून आलेले नाही. सज्जन लोक हे तीर्थक्षेत्रापेक्षा आणि साबणापेक्षा श्रेष्ठ असतात, असे संत तुकाराम महाराज यांचे विचार आहेत. कुंभमेळा हा भटांचा पर्वणी मेळा असतो, असे संत तुकाराम महाराजांचे परखड मत होते. कुंभमेळ्याला जाऊन आंघोळ करणं, केस कापणे, यात कसला आलाय धर्म? हा तर मूर्खांचा बाजार आहे. असे क्रांतिकारक आणि परखड मत तुकाराम महाराजांनी एका अभंगात मांडले आहे. त्यांनी सुमारे 5 हजार अभंग लिहिले. त्यांनी लोकांना कर्जमुक्त केले. संत तुकाराम महाराजांचा लढा विषमतेविरुद्ध होता. भेदभाव बाळगणे अमंगल आहे, तर समता बाळगणे मंगलमय आहे. सर्व माणसं समान आहेत. असे सांगून संत तुकाराम महाराजानी विषमतेला विरोध करून समतेचा आग्रह धरला. वर्णव्यवस्थेवर हल्ला करताना संत तुकाराम महाराज म्हणतात, वर्णाभिमाणे। कोण झाले पावन| ऐसें द्या सांगून। मजलागी। संत तुकाराम महाराजानी वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला केला. त्यामुळे जे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते, ते तुकाराम महाराजावर प्रचंड चिडले. कारण वर्णव्यवस्था हे ऐतखाऊ लोकांचे दुसऱ्याच्या श्रमावर जगण्याचे भांडवल होते. संत तुकाराम महाराजानी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला. नवसे कन्यापुत्र होती।मग का करणे लागे पती। नवस सायास करू नका,प्रयत्नानेच यश मिळेल. असाध्य ते साध्य। करिता सायास। कारण अभ्यास। तुका म्हणे। प्रयत्नवादी व्हा, दैवावर विश्वास ठेवू नका, प्रयत्न केल्याने अशक्य काम शक्य होते, हा संदेश संत तुकाराम महाराजानी दिला. सनातन्यांचा व आपला धर्म एक नाही, त्यामुळे त्यांचा संबंध तोडा, त्यांच्याकडून कोणतेही विधी करू नका,असा मोलाचा उपदेश संत तुकाराम महाराजानी केला. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड। काय त्यासी रांड प्रसवली।। तुका म्हणे ऐसें लंड। त्याचे हाणोनि फोडा तोंड! सनातन्यांच्या वर्चस्वातून समाज मुक्त व्हावा, या हेतूने संत तुकारामांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कडाडून हल्ला केला. ऐसें कैसे झाले भोंदू। कर्म करुनि म्हणती साधू।। अंगा लावुनिया राख। डोळे झाकुनि करिती पाप।। दावी वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।। तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती।। भटाची संगत सोडा, हे संत तुकाराम महाराजानी निक्षून सांगितले. त्यांनी यज्ञ, होम, हवन, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, दशक्रिया, पुरोहितगिरी, पंचांग, भविष्य याविरुद्ध मोहीमच उघडली, त्यामुळे सनातनी वर्ग संत तुकाराम महाराजांच्या विरोधात उभा राहिला. त्यांच्या अभंगांच्या गाथा सनातन्यांनी इंद्रायणीत बुडवल्या. ते पदोपदी संत तुकाराम महाराजाना त्रास देऊ लागले आणि अशातच एक दिवस संत तुकाराम महाराज नाहीसे झाले. ब्राह्मणी पक्षाच्या मतानुसार ते वैकुंठाला गेले, तर अभ्यासकांच्या मते त्यांचा घातपात झालेला आहे. दोन्ही पक्षाचे मत पाहण्यापूर्वी संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ, स्वर्ग याबाबत काय मत होते, ते आपण पाहू. संत तुकाराम महाराजानी स्वतः स्वर्ग, वैकुंठ, मोक्ष नाकारलेला आहे. ते म्हणतात, येथे मिळतो दहिभात। वैकुंठी त्याची नाही मात। पृथ्वीवर काबाडकष्ट केले तर दहीभात-भाजीभाकरी तर मिळेल, पण वैकुंठात जे कामधेनू, कल्पवृक्ष, चिंतामणी सांगितले जातात ते धादांत खोटं आहे.ते म्हणतात, भय नाही जन्म घेता। मोक्षपदा हाणो लाथा। तुका म्हणे आता। मज न लगे सायुज्यता। संत तुकाराम महाराज म्हणतात “या जन्माची मला भीती नाही, म्हणजे ते पृथ्वीवर राहू इच्छित होते, मोक्षाला लाथा घाला” असे म्हणून ते मोक्ष (वैकुंठ) नाकारतात. जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात, ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का?. तथाकथित मोक्षाचे अतिउच्च पद म्हणजे सायुज्यपद आहे, असे वैदिक परंपरा सांगते, त्या सायुज्यपदाला तुकाराम महाराज नाकारतात. म्हणजे जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात, ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का?. तुकाराम महाराज म्हणजे बोले तैसा चाले याची वंदावी पाऊले। म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत, हे त्यांच्याच अभंगावरून आणि विचारावरून स्पष्ट होते. मग तुकाराम महाराजांचा वयाच्या 42 व्या इतक्या तरुण वयात मृत्यू कसा झाला? संत तुकाराम महाराजांचा लढा सनातनी व्यवस्थेविरुद्ध होता. त्यांनी तुकाराम महाराजांना खूप त्रास दिला होता. तुकाराम महाराज विचाराने लढत होते, आणि सनातनी त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करत होते. त्यांच्या अभंग लेखनावर बंदी घालणे, त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवणे, त्यांची बदनामी करणे, या बाबी सनातन्यांनी संत तुकाराम महाराजांचा घातपात करून ते विमानात बसून वैकुंठाला गेले, अशी अफवा पसरवली. अफवा पसरवण्यात सनातन्यांचा हात जगात कोणीही धरणार नाहीत. वैकुंठाला खोटं ठरवणारे संत तुकाराम महाराजच वैकुंठाला गेले, असा प्रचार सनातन्यांनी केला, यावरून त्यांचा मृत्यू कसा झाला असेल याचा अंदाज नक्कीच बांधता येतो.