У нас вы можете посмотреть бесплатно hadsar fort| हडसर किल्ला | नाणेघाट चा पाहारेकरी | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची व दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पायऱ्या बांधून काढलेली आहे. राजदरवाज्याच्या वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात बुरूजापाशी पोहचता येते. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसऱ्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणाऱ्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पायऱ्या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे. मुंबई, ठाणे कडून येणाऱ्यांनी कल्याण वा ठाण्यावरून माळशेजमार्गे जाणारी कोणतीही एस. टी. बस पकडावी जसे - आळेफाटा, ओतूर, जुन्नर, अहमदनगर इ. त्यानंतर ३-४ तास प्रवास करून माळशेज घाट संपल्यानंतर १५-२० मिनिटावर असलेल्या सितेवाडी फाट्यावर उतरावे. तिथून किल्ला लगेचच नजरेस पडतो. उजवीकडे तिरप्या वाटेने वाडीतून घरे- शेतं ओलांडत अर्ध्या तासातच किल्ल्याची तटबंदी खाली येऊन पोहोचल्यावर गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी कातळात पायऱ्या खोदून काढल्या आहेत व आधारासाछी लोखंडी गज लावले आहेत त्यामुळे या वाटेने चालत राहावे. ही वाट खड्या चढणीमुळे अवघड वाटत असली तरी फार सोपी अशी आहे. एक पाऊल मावेल एवढ्या खोबण्या आहेत परंतु पकडायला मजबूत भक्कम आणि सुस्थितीत असलेले लोखंडी गजांमुळे भीती वाटत नाही. २०-२५ फुटांचा टप्पा हा उभ्या कातळात असल्याने सावधपणे पार केला की तिथेच समोर एक छोटी गुहा दिसते, त्यात गाळ असल्यामुळे ती पाहून पुढे गेल्यानंतर तुटलेल्या तटबंदीतून गडावर प्रवेश करता येतो. सितेवाडी पासून इथपर्यंत येण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. ही वाट एस. टी. बसचा प्रवासखर्च, प्रवासवेळ, आणि पायपीट दमछाक वाचवणारी आहे त्यामुळे येण्या-जाण्यास फार सोयीची आहे.#travel #fort #trending #nature #vlog #vlogs #pune #punevloggers ##mountains #chatrapatishivajimaharaj #maharashtra #maharashtranews #fortcharaja #trending #viralvideo #viralshorts