У нас вы можете посмотреть бесплатно Gajanan Maharaj Bavani | गजानन महाराज बावन्नी | Bhagyashree Deshpande | Gajanan Bavanni | bavani или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@ANUSHKARECORDINGSTUDIO PRESENT जय जय सद्गुरु गजानन । रक्षक तूची भक्तजना ।।१।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रुपात गजानन तू ।।२।। सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातील तू ।।३।। माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ।।४।। उष्ट्या पञावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट ।।५।। बंकटलालावरी तुझी । कृपा जाहली ती साची ।।६।। गोसाव्याच्या नवसासाठी । गांजा घेसी लावुनी ओठी ।।७।। तव पदतीर्थे वाचविला । जानराव तो भक्तभला ।।८।। जानकीराम चिंचवणे । नासवुनी स्वरुपी आणणे ।।९।। मुकिन चंदुचे कानवले । खाऊनी कृतार्थ त्या केले ।।१०।। विहिरामाजी जलविहिना । केले देवा जलभरना ।।११।। मद्य माश्यांचे डंख तुवा । सहन सुखे केले देवा ।।१२।। त्यांचे काटे योगबले । काढुनि सहजी दाखविले ।।१३।। कुश्ती हरिशी खेळोनी । शक्ती दर्शन घडवोनी ।।१४।। वेद म्हणूनी दाखविला । चकित द्रविड ब्राम्हण झाला ।।१५।। जळत्या पर्यकावरती । ब्रम्हगिरीला ये प्रचिती ।।१६।। टाकळीकर हरिदासाचा । अश्र्व शांत केला साचा ।।१७।। बाळकृष्ण बाळापूरचा । समर्थ भक्तचि जो होता ।।१८।। रामदासरुपे त्याला । दर्शन देवुनि तोषविला ।।१९।। सुकलालाची गोमाता । व्दाड बहू होती ताता ।।२०।। कृपा तुझी होतांच क्षणी । शांत जाहली ती जननी ।।२१।। घुडे लश्मन शेगांवी । येता व्याधी तूं निरवी ।।२२।। दांभिकता परि ती त्याची । तू न चालवूनी घे साची ।।२३।। भास्कर पाटील तव भक्त । उध्दरिलासी तू त्वरीत ।।२४।। आध्न्या तव शिरसा वंद्य । काकहि मानति तुज वंद्य ।।२५।। विहिरीमाजी रक्षीयला । देवां तू गणु जवर्याला ।।२६।। पितांबराकरवी लीला । वठला आंबा पल्लविला ।।२७।। सुबुध्दी देशी जोश्याला । माफ करी तो दंडाला ।।२८।। सवडद येथील गंगाभारती । थुंकुनि वारली रक्तपिती ।।२९।। पुंडलिकाचे गंडातर । निष्ठा जाणुनि केले दूर ।।३०।। ओंकारेश्र्वरी फुटली नौका । तारी नर्मदा शणात एका ।।३१।। माधवनाथा समवेत । केले भोजन अदृष्य ।।३२।। लोकमान्य त्या टिळकांना । प्रसाद तूंची पाठविला ।।३३।। कवर सुताची कांदा भाकर । भक्शीलीस प्रेमाखातर ।।३४।। नग्न बैसुनी गाडीत । लिला दाविली विपरीत ।।३५।। बायजे चिती तव भक्ती । पुंडलिकावर विरक्त प्रिती ।।३६।। बापुना मनी विठ्ठल भक्ती | स्वये होशि तू विठ्ठल मूर्ती ।।३७।। कवठ्याचा त्या वारकर्याला । मरीपासूनी वाचविला ।।३८।। वासुदेव यति तुज भेटे । प्रेमाची ती खुण पटे ।।३९।। उध्दट झाला हवालदार । भस्मिभूत झाले घरदार ।।४०।। देहांताच्या नंतरही । कितीजना अनुभव येई ।।४१।। पडत्या मजुरा झेलियले । बघती जन आश्चर्य भले ।।४२।। आंगावरती खांब पडे । स्ञी वांचे आश्चर्य घडे ।।४३।। गजाननाच्या अदभुत लीला । अनुभव येती आज मितीला ।।४४।। शरण जाऊनी गजानना । दुःख तयाते करि कथना ।।४५।। कृपा करी तो भक्तांसी | धावुन येतो वेगासी।।४६।। गजाननाची बावन्नी । नित्य असावी ध्यानीमनी ।।४७।। बावन्न गुरुवारी नेमे । करा पाठ बहूं भक्तीने ।।४८।। विघ्ने सारी पडती दूर । सर्व सुखांचा येई पुर ।।४९।। चिंता सार्या दूर करी । संकटातुनी पार करी ।।५०।। सदाचार रत सदभक्ता । फळ लाभे बघता बघता ।।५१।। भक्त गण बोले जय बोला । गजाननाची जय बोला ।।५२।। जय बोला हो जय बोला । गजाननाची जय बोला।। GAJANAN BAVANNI Music/Singer = Bhagyashree Deshpande Music Arranger = Sunil Mhatre Recording = Anushka Recording Studio, Navi Mumbai #BhagyashreeDeshpande #GajananBavanni #Gajanan