У нас вы можете посмотреть бесплатно भारतातल्या विद्यार्थ्यांना Astronomy शिकायची इच्छा आहे पण सुविधा नाहीत, IUCAA, TIFR चं सर्वेक्षण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांत मुलं चंद्र, ग्रह आणि ताऱ्यांबद्दल वाचतात. पण या गोष्टी त्यांना कितपत समजतात? भारतात झालेल्या एका अभ्यासातून दिसून आलंय की मुलांना खगोलशास्त्रात मोठा रस आहे. मात्र आकाश प्रत्यक्ष पाहण्याची किंवा त्यामागच्या संकल्पना अनुभवातून समजून घेण्याची संधी त्यांना फार कमी मिळते. पुण्यातल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विज्ञान शिकवताना व्हिडिओ, चित्रं आणि नोट्स यांचा वापर केला जातो. शाळेत दुर्बीणही आहे. पण ती कशी वापरायची याची माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आकाश निरीक्षणाचा अनुभव मिळत नाही. शिक्षकांच्या मते, विज्ञानातील काही संकल्पना मुलांना प्रत्यक्ष पाहिल्यावर अधिक चांगल्या समजतात. उदाहरणार्थ, सूर्यग्रहण किंवा चंद्राच्या हालचाली प्रत्यक्ष पाहिल्या तर त्या विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात. पुण्यातीलच मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये मात्र वेगळा प्रयोग केला जातो. इथे विद्यार्थ्यांसाठी नियमित आकाशदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या मदतीने मुलांना दुर्बिणीतून चंद्रावरील विवरं, शनिच्या कडा किंवा गुरुचे चंद्र दाखवले जातात. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा मुलं या गोष्टी प्रत्यक्ष पाहतात तेव्हा त्यांचा विषयातला रस आणि कुतूहल दोन्ही वाढतं. आयुका आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी देशभरातील सुमारे दोन हजार शाळांमधील विद्यार्थ्यांवर केलेल्या सर्वेक्षणात असं आढळलंय की फक्त एक तृतीयांश विद्यार्थ्यांनाच खगोलशास्त्राच्या संकल्पना नीट समजतात. केवळ 7 टक्के मुलांना चंद्राच्या कला समजावून सांगता आल्या. 26 टक्के विद्यार्थ्यांनी दुर्बीण पाहिली होती, तर 27 टक्क्यांनी तारांगणाचा अनुभव घेतला होता. तरीही 86 टक्के विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्रात रस असल्याचं सांगितलं आणि 70 टक्क्यांनी भविष्यात हा विषय शिकण्याची इच्छा व्यक्त केली. संशोधकांच्या मते, अवकाशातील संकल्पना समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष मॉडेल्स, प्रयोग आणि निरीक्षण यांची गरज असते. अनेक शाळांमध्ये ही साधनं नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या संकल्पना कल्पना करणे कठीण जाते. त्यामुळे अभ्यासक्रमात प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण वाढवण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत. कारण मुलांच्या कुतूहलाला योग्य दिशा मिळाली, तर त्यातून भविष्यातील वैज्ञानिक तयार होऊ शकतात. रिपोर्ट- प्राची कुलकर्णी #school #scienceshorts #Astronomy #AstronomyEducation #SpaceEducation #sciencelearning बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi