У нас вы можете посмотреть бесплатно 🎤Annual Gathering Anchoring | School Cultural Program | Stage Hosting| वार्षिक स्नेहसंमेलन अँकरिंग 🥰 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कधी कधी आपल्या आयुष्यात काही संधी अशा येतात, ज्या आपण स्वतः मागितलेल्या नसतात… पण त्या आपल्याला पुन्हा उभं राहायला शिकवतात. यावर्षी आमच्या स्कूलच्या Annual Function साठी अँकरिंग करण्याची संधी मला मिळाली. खरं सांगायचं तर अशा कोणत्याही मोठ्या स्कूल इव्हेंटमध्ये अँकरिंग करावं, हे माझं खूप दिवसांपासूनचं एक छोटंसं स्वप्न होतं… आणि ते स्वप्न इंद्रायणी फॅमिलीमुळे पूर्ण झालं. यावर्षीच्या गॅदरिंगची थीम होती — “महा माझा महाराष्ट्र”. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि अभिमान दाखवणाऱ्या या कार्यक्रमाचा भाग होणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. पण खरं सांगायचं तर त्या वेळेला माझी मनस्थिती अँकरिंग करण्याची नव्हती… मनाची तयारीही नव्हती. मात्र जेव्हा स्कूलमध्ये अँकरिंगसाठी नाव विचारलं गेलं, तेव्हा माझ्या आधीच माझ्या मैत्रिणींनी माझं नाव पुढे केलं. आमची नावं Principal Ma’am पर्यंत पोहोचली आणि त्यांनी माझं आणि किरण मॅम यांचं नाव निवडलं. त्या वेळी माझ्या मैत्रिणींनी मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली — घर आणि प्रोफेशन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कामाच्या ठिकाणी जे काही कार्यक्रम, इव्हेंट्स आपण करतो, ते आपल्या कामाचा एक भाग असतो. त्यामुळे मनात कोणताही अडथळा, संकोच किंवा “पण” न ठेवता हे सगळं मनापासून कर… त्यांच्या त्या शब्दांनी मला खूप बळ दिलं. माझ्या मैत्रिणींचा हेतू खूप सुंदर होता — मी कुठेतरी व्यस्त व्हावं… मी माझ्या दुःखातून थोडी तरी बाहेर पडावी… मी हे आव्हान स्वीकारलं. अँकरिंगची तयारी केली. स्क्रिप्ट तयार करून मॅमसमोर वाचून दाखवली… आणि त्यांना ती मनापासून आवडली. त्या क्षणी एक गोष्ट पुन्हा जाणवली — आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण कधी कधी आपल्यापेक्षा इतर लोकांना जास्त दिसतात. कदाचित म्हणूनच ही संधी माझ्यापर्यंत चालत आली असेल. आणि मग आम्ही ठरवलं… या संधीचं सोनं करायचंच. आज एक गोष्ट पुन्हा मनात ठाम झाली — जर आपण एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली, तर त्या गोष्टीला यशाच्या शिखरापर्यंत नेणं अशक्य नसतं. आयुष्यात संकटं, दुःख, कठीण प्रसंग येणारच… पण त्यातून बाहेर पडायचं असेल तर चालत राहणं हाच एकमेव पर्याय असतो. आणि कधी कधी स्वतःला व्यस्त ठेवणंही खूप मोठं औषध ठरतं. माझ्या या प्रवासात मला सावरायला माझ्या घरच्यांनी, इंद्रायणी फॅमिलीने, आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनी खूप साथ दिली. “तू अँकरिंग करू शकतेस” हा विश्वास कदाचित माझ्यापेक्षा जास्त माझ्या मैत्रिणींनाच होता. आणि त्यांच्या त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मीही ही संधी मनापासून स्वीकारली… आज मनापासून सांगावंसं वाटतं — इंद्रायणी फॅमिली ही फक्त एक संस्था नाही, तर माझ्यासाठी दुसरं कुटुंबच आहे. मला पुन्हा उभं राहायला मदत केल्याबद्दल माझ्या घरच्यांचे, इंद्रायणी फॅमिलीचे आणि माझ्या सर्व मैत्रिणींचे मनापासून आभार. ❤️ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर 👍 Like करा 💬 Comment करा 📌 आणि Channel ला Subscribe करा.