У нас вы можете посмотреть бесплатно (नेरल) फणसवाडी ते पेब दुर्गाच्या पायथ्यापर्यंत ट्रेक PART-1 THE DARK JUNGLE...🌳🏞️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पोहोचण्याच्या वाटा :१) नेरळ मार्गे :- पेबला जाण्यासाठी मध्य रेल्वेवरील नेरळ स्टेशनला उतरावे. नेरळ स्टेशनवर उतरल्यावर, समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. स्टेशनच्या बाहेर आल्यावर माथेरानच्या दिशेला न जाता उजवीकडची (मुंबईच्या दिशेची ) वाट पकडावी. या वाटेने डोंगराच्या दिशेने जाताना प्रथम ओढ्यावरील पुल, मग मैदान, पोल्ट्रीफार्म या मार्गे आपण १५ मिनीटात कातकरवाडीत पोहोचतो. येथे मुख्य रस्ता सोडून समोर दिसणार्या इलेक्ट्रीकच्या टॉवरच्या दिशेने मार्गक्रमण करावे. सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर आल्यावर तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळ आपल्याला ३ वाटा लागतात. १) धबधब्याला लागून असलेली वाट २) मधून गेलेली मुख्य वाट ३) टॉवर्सला लागून असलेली वाट या तीन वाटांपैकी मधली मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे. पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागते पण पुढे या वाटेने जाणे अशक्य आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसेच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधून जाणारी वाट पकडावी या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढावे. हीच वाट पुढे झर्या,ची होत असली तरी, ही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करावी. या खिंडीत पनवेलहून येणारी वाट येउन मिळते. खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे. तेथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगड चढण्यास कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोड्याच अंतरावर गुहा लागते. प्रथमच जाणार्र्यांनी वाटाडया घेणे हितकारक आहे. किल्ला चढण्यास दोन ते तीन तास लागतात. २) माथेरान - नेरळ रस्ता मार्गे :- माथेरान - नेरळ रस्त्यावर आणि रेल्वे मार्गावर " वाटर पाईप " स्टेशन आहे. या स्टेशन नंतर रेल्वे लाईन रस्त्याला जिथे आडवी जाते, तिथे " पेब (विकटगड) / प्रती गिरनार " ला जाण्याचा मार्ग असा बोर्ड लावलेला आहे. येथ पर्यंत एसटी किंवा खाजगी वाहनाने पोहोचता येते. या ठिकाणाहून रेल्वे मार्गाने चालायला सूरुवात केल्यावर थोड्याच वेळात डाव्या हाताला वरच्या बाजूस " माथेरानचा पॆनोरमा पाँईंट" दिसायला लागतो. पुढे वळसा घेऊन रेल्वे लाईन एका खिंडीत पोहोचते. ही खिंड पार केल्यावर उजव्या बाजूस पेब किल्ला दिसतो.थोडे अंतर चालल्यावर उजव्या बाजूला लोखंडाची भगव्या रंगाची कमान दिसते. रस्त्यापासून कमानी पर्यंत पोहोचण्यास पाऊण तास लागतो. कमानीतून खाली उतरण्याकरीता पायर्या आहेत. या पायर्या उतरल्यावर पहीली शिडी लागते. शिडी उतरल्यावर वाट डोंगराच्या कडेकडेने पेब व माथेरानचा डोंगर र्यांच्या मधील खिंडीत येते. येथून समोर गडावरील एकमेव बुरुज दिसतो. पुढे दुसर्या शिडी जवळ कातळभिंतीत एक नेढ आहे. ही शिडी चढल्यावर आपण महादेवाचे मंदिराजवळील पाण्याच्या टाक्र्यांपाशी पोहोचतो. या मार्गाने किल्ल्यावर पोहोचण्यास १.३० ते २ तास लागतात. #explore #forts #adventure #explorepage #marathi #viralvideo #youtube #maharashtra #fort #pebfort #sangli #satara #kolhapur