У нас вы можете посмотреть бесплатно मेनोपॉज क्लिनिक काय आहेत? मासिक पाळी बंद होण्याच्या काळात महिलांना कशी मदत होणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
साधारण वयाच्या 45 वर्षांनंतर अनेक महिलांच्या आयुष्यात नैसर्गिक पण मोठा शारीरिक आणि मानसिक बदल सुरू होतो. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती. मासिक पाळी बंद होण्याच्या काळात येणाऱ्या लक्षणांबद्दल अनेक महिलांना पुरेशी माहिती नसते. ठाण्यातील 45 वर्षीय अनिता शिंदे यांना काही महिन्यांपासून थकवा, चिडचिड, झोप न लागणे आणि शरीरदुखी जाणवत होती. पण हे सगळं मेनोपॉजशी संबंधित असू शकतं, याची कल्पनाही त्यांना नव्हती. मुलीसोबत तपासणीसाठी गेल्यावरच त्यांना कळलं की त्या पेरिमेनोपॉज या टप्प्यातून जात आहेत. नालासोपाऱ्यातील शीतल चव्हाण यांनाही पाळी बंद झाल्यानंतर झोप न लागणे, थकवा आणि चिडचिड अशा समस्या जाणवू लागल्या. या त्रासांमागे मेनोपॉज कारणीभूत असू शकतो, हे अनेक महिलांना उशिरा समजतं. डॉक्टरांच्या मते, या काळात शरीरातील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी होत असल्यामुळे झोपेचे त्रास, मूड स्विंग्ज, चिंता, नैराश्य, हॉट फ्लशेस, थकवा किंवा हाडं कमजोर होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर काही महापालिका आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. इथे महिलांना तपासणी, समुपदेशन आणि आवश्यक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महाराष्ट्रात 500 हून अधिक ठिकाणी मेनोपॉज कक्ष सुरू झाले आहेत. मात्र अजूनही अनेक महिलांना या सुविधांबद्दल माहिती नाही. रिपोर्ट- दिपाली जगताप शूट- शाहीद शेख व्हीडिओ एडिट- शरद बढे #Menopause #WomenHealth #HormonalChanges #MentalHealthWomen बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi