У нас вы можете посмотреть бесплатно महादेवाचे केरवडे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महादेवाच्या केरवडेतील श्रद्धेचा थांबा तालुका - कुडाळ महादेवाचे केरवडे गावातील येणा-या माणगांव, दुकानवाड परिसर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा, गोवा व कर्नाटक राज्य तसेच कोल्हापूर जिल्हयातील आजरा, भुदरगड, चंदगड, कोल्हापूर, गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरी, हातकणंगले या भागातून येणा-या सिद्ध महादेवाच्या भक्तांचा थांबा म्हणजे ‘महादेव मंदिर स्टॉप’ होय. महादेवाचा मंदिर स्टॉप सिद्ध महादेव मंदिराच्या परिसरातच आहे. एका बाजूला मंदिर, समोर रंगमंच बाजूला ढवळे बाबांचे समाधी स्थान, केरवडे कर्याद नारूर ग्रामपंचायतीची इमारत व दुस-या बाजूला पशुवैद्यकीय दवाखाना व धर्मशाळा अशी या थांबा परिसरातील रचना आहे. माणगांव खो-याचा परिसर हा सिद्ध पुरुषांची व देव स्थानांची भूमी असलेला प्रदेश आहे. माणगांवचे टेंब्ये स्वामी महाराज, श्री यक्षिणी दत्तमंदिर, नारूरचे महालक्ष्मी मंदिर, हळदीचे नेरूर येथील जटाशंकराचे मंदिर आणि त्याचप्रमाणे ख्याती असलेले केरवडे येथील सिद्ध महादेवाचे देवस्थान. प्रतिवर्षी मंदिराचा हरिनाम सप्ताह झाल्यानंतरच्या दर सोमवारी श्री सिद्ध महादेवाच्या यात्रेला सुरुवात होते, ती पावसाळा सुरू होईपर्यंत. मानव जन्म घेतलेले दोन सिद्ध पुरुष देवपण प्राप्त करत देवाच्या गादीवर बसले. ही गादी म्हणजे येथील महादेव मंदिर. १७६५मध्ये महादेवाच्या केरवडे येथील परब घराण्यात पहिले महादेव यांचा जन्म झाला. मुलाचे नाव सोमाजी असे ठेवण्यात आले. हा मुलगा नेरूर येथील महादेवाचा भक्त बनला. त्यांचे बालपण व तारुण्य भक्तीच्या वेडातच गेले. ते दर सोमवारी महादेवाच्या दर्शनाला नारूर येथे जात असत. ते कोणाबरोबर जास्त बोलत नसत. त्यांच्या अशा वागण्यामुळे लोक त्यांना वेडा म्हणत असत. त्यांना एकांत मिळावा म्हणून गावाजवळील निळेली येथील तळीकाठच्या आंब्याच्या झाडाखाली येऊन बसले.येथे धुमक घराण्याने त्यांची सेवा केली. महादेवांच्या गाव सोडण्यामुळे गावात अनेक अपशकुन होऊ लागले. गावात रोगराई पसरू लागली. सोमाजी सर्वसामान्य मानव नसून सिद्ध पुरुष आहे, अशी खात्री पटताच ग्रामस्थ त्यांना आणण्यासाठी गेले. सर्व गाव त्यांना शरण गेला. परंतु सोमाजी परतण्यास तयार नव्हते. धुमक यांनी विनंती केल्यावर ते परतण्यास तयार झाले. परंतु त्यांनी आपणास निश्चित जागा देण्यात यावी, अशी मागणी केली. ते केरवडे गावात आल्यावर त्यांनी आपल्या हातातून एक दगड फेकला. तिथे आपणास झोपडी बांधून देण्याची गावक-यांना विनंती केली. तिथे गावक-यांनी पाच खांबांचे देऊळ तसेच बसण्यासाठी दुधाचा वापर करून पेढी बांधून दिली. हेच छोटेसे देऊळ म्हणजेच आताचे येथील महादेव मंदिर. या महादेव मंदिरात महादेवाचे भक्त दररोज येतच असतात. विशेषत: सोमवारी येथे गर्दी असते. हा महादेव मंदिर स्टॉप माणगांव ते शिवापूर या मुख्य रस्त्यापासून अर्धा एक किलोमीटर आत आहे. गावातील प्रत्येक जण महादेवाचे दर्शन घेऊनच प्रवासाला निघतात. त्यामुळे महादेव मंदिरामुळे या थांब्याला श्रद्धेचा थांबा असे म्हटले तर वावगे ठरू नये. (सदर माहिती प्रहार ०४/०३/२०१५ ह्या अंकातुन घेतली आहे)