У нас вы можете посмотреть бесплатно मालेगांव:-वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा ( पुर्व) च्या वतीने बहुसंख्यांनी पक्ष प्रवेश सोहळा संपन्न. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🎤Bol इंडिया News 🇮🇳 ☝️एक बोल सत्याचा 🎙️ 📡Network Of India 🛰️ Publisher By [email protected] मालेगाव -: वृत्तसेवा प्रसिद्ध करीता सविस्तर माहितीसाठी वृतांत विनामूल्य मालेगाव शहर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे दिनांक २० डिसेंबर २०२५रोजी वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व च्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात मालेगाव (प्रतिनिधी): वंचित बहुजन आघाडी, नाशिक पूर्वच्या वतीने मालेगाव येथील हॉटेल ग्रँड सविता येथे कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा समन्वयक मा. दिशाताई पिंकी शेख उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी चळवळीत मागील काळात निधन झालेले कार्यकर्ते तसेच निर्भया ते डोंगराळे गावातील लहान मुलीच्या अमानुष हत्येप्रकरणी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दिशाताई पिंकी शेख यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांच्या हस्ते, राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांचा सत्कार जिल्हा महासचिव संजय जगताप यांच्या हस्ते, राज्य प्रवक्ते तय्यब जफर यांचा सत्कार उपाध्यक्ष कैलास लोहार यांच्या हस्ते, तर महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत यांचा सत्कार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक उशीरे, एकनाथ पगारे व संदीप महिरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे यांनी केले. या मेळाव्याचे औचित्य साधून नांदगाव, मनमाड, कळवण, देवळा व चांदवड येथील अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. नाशिक पूर्व भागातील विविध तालुक्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश व सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना दिशाताई शेख यांनी वंचित बहुजन आघाडी हा सर्वसमावेशक व सर्व जाती-धर्मांना सामावून घेणारा पक्ष असल्याचे सांगत नवप्रवेशित कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. उत्कर्षाताई रूपवते यांनी वंचित बहुजन आघाडी ही केवळ संघटना नसून अखंड चालणारी चळवळ असल्याचे सांगून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विजय मिळवण्यासाठी सर्वांनी सक्रिय राहण्याचे आवाहन केले. राज्य प्रवक्ते तय्यब जफर यांनी स्थानिक प्रश्नांकडे प्रस्थापित पक्षांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, वंचित बहुजन आघाडीला यश मिळाल्यास मालेगावच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत यांनी कार्यकर्ताच पक्षाची खरी ताकद असल्याचे सांगून संघटन मजबूत करण्यावर भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष आम्रपाली निकम यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष जगदीश खरे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा पदाधिकारी सुदर्शन ठाकरे, राम बस्ते, कादीर शेख, शशिकांत पवार, संतोष केदारे, मुकेश गरुड, दत्तू बर्डे यांच्यासह मालेगाव, नांदगाव, मनमाड, चांदवड, देवळा व कळवण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.