У нас вы можете посмотреть бесплатно ऐतिहासिक किल्ला देवगड किल्ला,सिंधुदुर्ग,कोकण | Historic Fort Devgad Fort,Sindhudurg,Konkan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी हा किल्ला 1729 मध्ये दत्ताजीराव आंग्रे यांनी बांधला होता. हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. इ.स.१७७२ मध्ये वॉल्टर ब्राऊन याने वाडीकर सावंतांच्या मदतीने देवगड किल्ल्यावर हल्ला चढविला होता, पण त्या हल्ल्यात त्यांचा पार धुव्वा उडाला होता.इ.स.१८१८ मध्ये कर्नल इम्लाफ याने हा किल्ला जिंकून घेतला. देवगड प्रसिध्द आहे ते हापूस आंब्यासाठी. प्राचिन काळापासून देवगड हे एक सुरक्षित बंदर म्हणूनही प्रसिध्द आहे. देवगड बंदराच्या तीन बाजूंनी असलेल्या डोंगरांमुळे तेथे नाले सारखा आकार तयार झाला आहे, त्यामुळे या भागात पावसाळ्यातही उंच लाटा तयार होत नाहीत. याच कारणासाठी शिवाजी महाराजांच्या काळात व आजही मालवण, वेंगुर्ला व आजूबाजूच्या बंदरातील बोटी पावसाळ्यात देवगड बंदरात नांगरल्या जातात. देवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकावर वसलेला आहे. त्यामुळे त्याला ३ बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. देवगड किल्ला दोन भागात विभागलेला आहे. (१) टेकडीवरील बालेकिल्ला व (२) समुद्राला लागून असलेला किल्ल्याचा भाग. देवगड गावात किल्ल्याबद्दल विचारल्यास थेट टेकडीवरील बालेकिल्ल्याचा रस्ता दाखवतात आणि सामान्य पर्यटकही तेवढाच किल्ला पाहून परत जातात १) देवगड किल्ला दोन भागात विभागलेला आहे. (१) टेकडीवरील बालेकिल्ला व (२) समुद्राला लागून असलेला किल्ल्याचा भाग. देवगड गावात किल्ल्याबद्दल विचारल्यास थेट टेकडीवरील बालेकिल्ल्याचा रस्ता दाखवतात. संपूर्ण किल्ला कमी वेळात पहायचा असल्यास प्रथम बालेकिल्ला पहावा नंतर मधल्या पायर्यांच्या वाटेने खाली उतरून समुद्राला लागून असलेला किल्ल्याचा भाग पहावा व तेथून थेट गावात चालत जावे. २) देवगड पासून २१ किमी अंतरावर विजयदुर्ग किल्ला आहे. स्वत:चे वहान असल्यास देवगड व विजयदुर्ग हे दोनही किल्ले एका दिवसात पाहून होतात. ३) देवगड - जामसांडे - तळेबाजार - तिठा यामार्गे (अंतर अंदाजे २० किमी) कोटकामते गावात जाता येते. कोटकामते येथे भूईकोटाचे अवशेष व कान्होजी आंग्रेंचा शिलालेख पहायला मिळतो. कोटकामतेची माहिती साईटवर दिलेली आहे. ४) देवगड पासून १० किमी अंतरावर समुद्र किनार्यावर कुणकेश्वराचे प्राचिन मंदिर आहे. छ. शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. स्वत:चे वहान असल्यास देवगडहून मालवणला जातांना हे मंदिर पहाता येते. ५) देवगड पासून मालवण ५० किमी अंतरावर आहे. स्वत:चे वहान असल्यास देवगड व विजयदुर्ग हे दोनही किल्ले एका दिवसात पाहून मालवणला मुक्काम करता येईल.