У нас вы можете посмотреть бесплатно Aangewadi: भराडी देवीच्या जयघोषात भाविकांचा उसळला जनसागर. | Bharadi devi jatra 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दक्षिणेच्या काशीत भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळाली आई भराडी मातेच्या जयजयकारात दुमदुमली दक्षिण काशी भराडी देवीच्या जयघोषातच भाविकांचा उसळलेला जनसागर अशा भक्तीपूर्ण, चैतन्यमयी आणि उत्साहवर्धक वातावरणात दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ ९ फेब्रुवारी झाला. सोमवारी भल्या पहाटे ३ वाजल्यापासून भराडी देवीच्या प्रांगणात जणू भक्तांचा जनसागर उसळला होता. श्री देवी भराडीच्या या वार्षिक जत्रेत सोमवारी रात्री भाविकांच्या अलोट अशा उच्चांकी गर्दीने यात्रोत्सवाच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढतानाच आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते हे वाहनांनी भरून गेले होते. दरम्यान या यात्रोत्सवाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे, मंत्री आशिष शेलार, खासदार संजय दीना पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, आमदार कालिदास कोळबकर, आमदार दीपक केसरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, आमदार निरंजन डावखरे, खासदार अरविंद सावंत आमदार रवींद्र चव्हाण, आमदार अनिल परब, यांच्यासह लोकप्रतिनिधी व इतर मान्यवर व्यक्तींनी आंगणेवाडी येथे उपस्थित राहून भराडी देवीचे दर्शन घेतले.