У нас вы можете посмотреть бесплатно कोहोज किल्ला🚩| Kohoj fort trek | Kohoj fort History | My First Trek | Marathi vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोहोज किल्ला | Kohoj fort trek | Kohoj fort History | My First Trek | Marathi vlog. #kohojfort#fortvideo#marathivlogger कोज्या नावाच्या डोंगरावर हा किल्ला बांधला गेला अशी दंतकथा आहे. किल्ल्याची उंची ३२०० फुट आहे. येथिल पाण्याच्या हौदाची रचना पहाता हा किल्ला सुमारे ८०० वर्षांपूर्वी भोज राजवटीत बांधला गेला असे अनुमान निघते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या स्वारीच्या वेळी येथे टेहळणीसाठी बुरुज बांधला व सैन्य ठेवले होते असा इतिहास आहे. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट बुरूज चढवले. छ. शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला स्वराज्यात होता. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला होता. पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीच्या खोर्यात गोतारा, कामणदुर्ग, कोहोज असे काहीसे अल्पपरिचित किल्ले आहेत. यापैकी वाडा - पालघर रस्त्यावरचा ‘कोहोज’ हा प्रमुख किल्ला वाड्यापासून अवघ्या १० ते ११ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. ‘कोहोज’ किल्ल्यावरील माणसाच्या आकाराच्या निसर्ग निर्मित सुळक्यामुळे या भागातून प्रवास करताना हा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. मुंबई - ठाण्याहून जवळ असूनही या भागातल्या किल्ल्यांवर डोंगर भटक्यांचा वावर तसा कमीच आहे. त्यामूळे किल्ल्यांवर जाणार्या वाटा मोडलेल्या आहेत. तसेच अनेक ढोरवाटांमुळे याभागात वाट चूकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या किल्ल्यांवर जातांना गावातून वाटाड्या घेऊनच जावे.. [ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]