У нас вы можете посмотреть бесплатно Ancient Khandeshwar Temple Nandgaon | प्राचीन शिवालय नांदगाव खंडेश्वर Nandgaon Khandeshwar Amravati или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Khandeshwar Temple, Nandgaon Kh Dist. Amravati Dr. Jayant Wadatkar 9822875773 Nandgaon is small town situated on Amravati to Yavatmal road, 35 km from Amravati. there is one ancient Hemadpanthi about 800 year old temple of Khandeshwar shiva. main temple constructed in black sand stone with beautiful carvings. temple is south face. there are three temples connected to common mandapa. Main temple is Shiv temple with shivlinga situated on east side with west face. North side temple is Shiv Parvati Temple and west side temple having Hiranyakashyapu statue. नांदगाव खंडेश्वरचे यादवकालीन देवालय डॉ. जयंत वडतकर भाग 1 अमरावती ते यवतमाळ मार्गावर, अमरावतीहून सुमारे ३५ किमी अंतरावर नांदगाव या गावी खंडेश्वराचे एक प्राचीन व वैशिष्टपूर्ण असे देवालय आहे. या मंदिरावरूनच ह्या गावाची ओळख नांदगाव खंडेश्वर अशी झालेली आहे. गावाच्या ईशान्य दिशेस एका टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यास मागील बाजूस असलेल्या पक्क्या सडकेने थेट मंदिरापर्यंत पोहोचता येते. मंदिरास उंच परकोट असून परकोटात पूर्वेकडून नव्याने बांधलेले प्रवेशव्दार असून दक्षिण दिशेकडून जुने प्रवेशव्दार आहे. गावातून नव्यानेच बांधकाम करण्यात आलेल्या पायऱ्यावरून सुद्धा मंदिरात जाता येते. या देवालयाचे बांधकाम साधारणता ८०० वर्षापूर्वी म्हणजेच तेराव्या शतकात झालेले असावे. येथे उपलब्ध असलेल्या एका शिलेलाखावरून या मंदिराचा निर्मिती काळ शके ११७७ आनंद संवत्सरी म्हणजेच ई.स. १२५५ असा असून हे मंदिर देवगिरीच्या यादव कुळातील राजा कृष्णदेवराय यांच्या काळात त्यांचा प्रधान व कुशल स्थापत्यज्ञ हेमाद्रीपंत यांच्या देखरेखीत बांधल्या गेले असावे. कौडन्यमुनीचे शिष्य श्री. खंडेश्वर यांनी या ठिकाणी साधना करून शिवलिंगाची स्थापना केली म्हणून या शिवाचे खंडेश्वर असे नाव प्रचलित झाले. मंदिराच्या बाह्यअंगावर कोरीव काम व कोरीव शिल्पांमुळे मंदिर अधिकच आकर्षक वाटते. मंदिराचे मुख्य बांधकाम हे पाषाणातील असून नंतरच्या काळात बांधलेले शिखर मात्र उंच व विटांनी बांधलेले आहे. येथील विटा पाण्यावर तरंगतात असे येथील लोक सांगतात. मंदिराच्या बांधकामात एका ठिकाणी दगडात एक लोखंडी कांब अडकलेली असून त्यास “शिवजी कि चाबी” असे म्हटल्या जाते. मुख्य मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केलेले असून मंदिर दक्षिणमुखी आहे. मंदिरास तीन गाभारे असून मुख्य गाभारा पूर्व दिशेस आहे. पूर्वेकडील गाभाऱ्याच्या दर्शनी भागावर रेखीव असे शिल्पकाम केलेलं असून तो प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट असा नमुना आहे. गाभाऱ्या समोरच दगडात कोरलेला नंदी बसलेला असून गाभाऱ्यात शिवलिंग आहे. गाभाऱ्यात खाली उतरून जावे लागते. या गाभाऱ्या समोरच पश्चिमेकडील गाभारा असून गाभाऱ्यात हिरण्यकश्यपूचा वध करणाऱ्या नृसिंहाची मोठी मूर्ती आहे. नृसिंहाच्या पायाजवळ भक्त प्रल्हाद व त्याची आई दर्शविलेले आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दारा समोरच उत्तरेकडील तिसऱ्या गाभाऱ्यात शंकर पार्वती यांची मूर्ती आहे. या तिन्ही गाभाऱ्याला जोडणारा सभामंडप किंवा मुख्य गाभारा प्रशस्त असून दगडी खांबावर तोलून धरलेला आहे. काळ्या पाषाणातील दगडी स्तंभावर विविध शिल्पे कोरलेली असून दगडातील छत अजूनही मजबूत असे आहे. या मंदिराच्या समोरील भागावर १९५९ साली वीज पडल्यामुळे सभामंडपचा काही भाग कोसळला होता, परंतु तो नंतर दुरुस्त करण्यात आला. मंदिरात सकाळ सायंकाळ आरती च्या वेळात स्वयंचलित नगाऱ्याच्या आवाज मंदिरात यावेळी निनादात असतो. Camera & Gear used – 1) Video shoot with : Canon Power Shot SX50HS and GoPro Hero 6 2) Photographs - Canon Power Shot SX50HS Music credits- YouTube Library - https://www.youtube.com/audiolibrary/... Touch_Tone Category –History & Education #Nandgaon#Khandeshwar#Amravati#Hemadpanthi#Ancient Temple#Vidarvha#