У нас вы можете посмотреть бесплатно Kalaram Mandir | Part 1 | Jai Shree Ram | Ram Lakshman Sita | Panchavati | Nashik | Maharashtra или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Kalaram Mandir | Part 1 | Jai Shree Ram | Ram Lakshman Sita | Panchavati | Nashik | Maharashtra काळाराम मंदिर बद्दल प्रभु श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सिता १४ वर्षाच्या वनवास कालावधीमध्ये गोदावरीच्या उत्तर तिरावर ह्याच परिसरात "पंचवटीत" वास्तव्यास होते. ज्या परिसरात प्रभुंची पर्णकुटी होती त्याच परिसरात सध्याचे नयन मनोहर 'श्री काळाराम मंदिर' आहे. प्रभु श्रीरामचंद्राच्या १४ वर्ष वनवासातील अंदाजे दहा साडेदहा वर्षानंतर अडीच वर्ष प्रभुश्रीरामचंद्र, लक्ष्मण, सितेसह ह्याच परिसरात वास्तव्यास होते. प्रभुश्रीरामचंद्रांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेल्य ह्याच भूमिवर ह्याच परिसरात आजचे हे 'श्री काळाराम मंदिर' आहे. श्री प्रभुरामचंद्र पंचवटीत वास्तव्यास आले त्या संदर्भात 'श्रीरामायण' संदर्भ पाहता वनवासात.. प्रभुरामचंद्र प्रथम तमसा नदीकाठी आले. तमसा नदी ओलांडून भगिरथी नदीकाठी आले. तेथे निषादराजा गृहक याचे नावेतून गंगानदी पार केली. नंतर ते त्रिवर्ग त्रिवेणी संगमापर्यंत प्रयागला गेले. प्रयागानंतर ते त्रिवर्ग भरव्दाज ॠर्षींच्या आश्रमात गेले. मग भरव्दाज्यांना वंदन करून राम, लक्ष्मण, सिता सिध्देश्र्वर येथे पोहोचले. तेथून चित्रकुट पर्वतावर आले. चित्रकुट येथे पर्णकुटी बांधून राहू लागले. चित्रकुटला राम-भरत भेट झाल्यावर, भरत श्रीरामांच्या पादुका घेऊन गेल्यावर तेथे राहणारे कित्येक तपस्वी ब्राम्हण एकत्र जमले व कुजबूज करू लागले. राक्षस रात्रीच्या वेळी हल्ला करून तपस्वी, ब्राम्हण लोकांचा वध करतील अशी भिती वाटते व आपण मारले जावु या भितीने सर्व बाम्हण प्रभु श्रीरामांना नमस्कार करूण स्त्रिया व मुले यासह तेथून निघून जाऊ लागले. तपस्वी लोकांचे असे चित्रकुट सोडून जाणे प्रभु श्रीरामांना रूचले नाही. तेव्हा चित्रकुट सोडून प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीता यांनी त्रिवेणी दंडकारण्यात प्रवेश केला. प्रथमत: आत्रिॠर्षींच्या आश्रमात आले. आत्रि व अनुसया यांचे आशिर्वाद घेऊन दंडकआरण्यात मार्गक्रमण करतांना विराध नावाच्या प्रचंड राक्षसाचा वध केला तेथून शरभंग ॠर्षींच्या आश्रमात आले. शरभंग ॠर्षींच्या दर्शनानंतर सुतीस्ण ॠर्षींच्या आश्रमात आले. तेथून दंडकआरण्यवासी तपस्वी मुनींच्या आश्रमात दर्शन करण्याचे उद्देशाने पच्चामर तीर्थ व मांडकरर्णि मुनींच्या आश्रम परिसरात आले नंतर आळीपाळीने तपस्वी मुनींच्या आश्रमात कुठे दहा महीने, कुठे चार महिने, कुठे आठ महिने अशा प्रकारे त्याचे वनवासातील दहा वर्ष संपले. तेथुन परत महामुनी सुतीक्ष्ण यांच्या आश्रमात आले. सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात काही काळ थांबुन तेथून अगस्ति ॠर्षींचे धाकटे बंधू महामती ॠर्षींच्या आश्रमात आले. महामती ॠर्षींनी दाखविलेल्या मार्गाने त्रिवर्ग अगस्ती मुनीच्या आश्रमात आले. प्रभु श्रीराम अगस्ती मुनींना प्रर्थना करतात की, "पितृवचन पाळण्यासाठी आम्ही वनात आलो आहोत तर आम्ही कोठे रहावे या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे" अगस्ती ॠर्षींनी सांगितल्याप्रमाणे गोदावरी नदीच्या काठी "पंचवटी" हे पवित्र्य स्थान आहे. तेथे प्रभु श्रीरामांनी पर्णकुटी बांधून हा परिसर अधिक पावन केला. ह्या पंचवटीत श्रीरामायणातील लीला पाहता शूर्पणखेचे कान- नाक कापणे, खर, दूषण, त्रिशिरा आदी चौदा हजार राक्षसांचा निःपात, मारिचवध आणि सीताहरण, सीता हरणानंतर प्रभु श्रीराम व लक्ष्मण सितेच्या शोधासाठी दक्षिणेकडे गेले व त्यांची पंपासरोवरी श्रीमारूतीची व सुग्रीव यांची भेट झाली व सीताशोध व रावणवध हा श्री रामायणातील पुढील भाग आहे. प्रभुंच्या अशा पावण वास्तव्याचे ठिकाणी हे नयनरम्य "श्री काळाराम मंदिर आहे". मंदिरात प्रभु श्रीराम लक्ष्मण व सीता याच्या मुर्ती आहेत. ह्या मुर्ती "स्वयंभू" असून वालुकामय व शामवर्ण असल्यामुळे देवतेस श्री 'काळाराम" म्हणतात. | दक्षिणे लक्ष्मणोयस्थ वामे तु जनकात्मजा | पुरतो मारूतीर्थस्य तं वंदे रघुनंदनम् ||३१|| श्रीरामरक्षेतील वरील श्र्लोकाप्रमाणे गर्भगृहांत मध्यभागी प्रभुराम त्यांच्या उजव्या बाजुस लक्ष्मण व डाव्या बाजूस सीता ह्यांच्या मुर्ती असून समोरील सभामंडपात दास मारूती 'श्रीराम जय राम जय जय राम' असा जप करीत हात जोडून प्रभू सेवेसाठी उभा आहे. ह्या सभामंडपातील मारूतीची मूर्तीची दृष्टी साध्यता श्रीप्रभुरामचंद्रांच्या चरणांशी खिळलेली आहे. Do Like, Share with Everyone, and Subscribe to Paulkhuna to Watch New Episodes respectively. Press the Bell icon to be Updated with us & Let us know Your Views on the Video in the comments section. #kalarammandir #ramlakshman #hindupilgrimage #nashik #panchavati #ramsita #shravanmass Do Like, Share with Everyone, and Subscribe to Paulkhuna to Watch New Episodes respectively. Press the Bell icon to be Updated with us & Let us know Your Views on the Video in the comments section. FOLLOW US ON SOCIAL MEDIA: FACEBOOK: / paulkhunathefootprints YOUTUBE: https://www.youtube.com/Paulkhunathef... INSTAGRAM: / wizwings.paulkhuna