У нас вы можете посмотреть бесплатно * или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रिय शेतकरी मित्र, आज प्लाट भेट प्रसंगी श्री योगेश भाऊ सूर्यवंशी,वळण,वैजापूर,झाड संख्या ५५०,पानगळ दिनांक ४ डिसेंबर २०२६,पहिला बहर व्यवस्थापन,१९ महिने झाड पूर्ण अवस्था! डाळिंब या पिकात हे नक्की आहे की डाळिंब लागवड केल्यावर पहिले २ वर्ष आपल्याला फूल निर्मिती,सेटिंग अवस्था किवा रोगराइ मुक्तपणा हा फार कमी बघायला मिळतो…… खरे चैलेंज हे ३ वर्ष नंतर बघायला मिळते…..ज्या शेतकरी बांधवांच्या प्रॅक्टिस या लागवडीपासून ते बाग आहे तोपर्यंत काटेकोर पणे आहेत तेच टिकतील या स्पर्धाच्या युगात! *आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आंबिया बहर खर्या अर्थाने सुरुवात झाली आहे व सर्वांना मनापासून प्रेमपूर्ण शुभेच्छा…..नक्की सर्वांनी भगवंताची प्रार्थना करून भगवंत नाम हे जास्तीत जास्त घेण्याचा संकल्प निर्मिती करून प्राप्ती संपादित करावी ही नम्र इच्छा!!! आपण आंबिया बहर ला खूप महत्व देत असतो प्राकृतिक दृष्टिकोनातून…..येथून पुढे तीळ तीळ उन्हाची तीव्रता हे वाढ घेणार आहे….पुढे इंच इंच व नंतर आपल्या हाताच्या बिलास च्या गतीने उन्हाचा तीव्रता ही वाढणार आहे…….त्यामुळे आपण डाळिंब बागायतदार या नैसर्गिक गोष्टीचा पूर्णपणे फायदा हा घेणार आहोत. श्री योगेश भाऊ चा वीडियो बनवण्याचा हा प्रयत्न होत की आपल्याला पानांची चौकी सेट झाल्यावर गर्भधारणा सुरुवात झाली आहे यामधे काही विशिष्ट श्री बायो उत्पादनाचा वापर हा आपण रेग्युलर स्टेज ची हिशोबाने हे केला असून……१००% त्यामध्ये रिझल्ट्स आले असे आपण म्हणणे नाही पण योग्य वेळेस योग्य उत्पादनाचा फायदा हा आपल्याला मिळवणे गरजेचे आहे…….आज मार्किट मधे फुल निघण्यासाठी मोठे मोठे ब्रँड आपण बघत असतो…….पण ते मारल्यावर पण फूल त्या प्रमाणात निघत नाही,आपण ते फवारणी किवा ठिबक मधून सोडल्यावर झाडाने रेस्पॉन्स नाही दिला तर तेथे पछताप वाटतो…..आपले पैसे हे आपण पाण्यात किवा निव्वळ जमिनीत,फूल निघावे म्हणून टाकत असतो फक्त एकच अपेक्षा फूल हे भरपूर निघावे व सेटिंग ही अनुकूल प्रमाणात व्हावी त्यात वातावरणने साथ दिली तरच आपण यशस्वी होवू ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे हे आपण लक्षात घ्यावे…….आपण शेतकरी यामुळे जितका आपला औषधे व खतांवर विश्वास आहे तितका आपण जे डाळिंब बागेच्या हिशोबाने काम/प्रॅक्टिस केले तर नक्की यशस्वी होवू……हे या लेख मधून सांगायचे आहे. वरील वीडियो मधून आपण नक्की ३०-३५ दिवस मधील असलेली परिस्तिथी ही लक्षात येईल व आपण नक्की अभ्यास हा करावा……केन का काढू नये,कोणते लिक्विड दिल्याने काय फायदा होतो…..आपल्याला स्टेज,खते व औषधे ही लक्षात घेणे आहे……खूप सोपे आहे डाळिंब आपण ते अवघड करून ठेवले आहे त्याचे एकमेव कारण आपल्या मनातील भीती व काळजी पोटी बैचेन होत असतो……..जसे कपाशी चे बी लावल्यानंतर पहिले फूल हे ३५ सव्या दिवशी येते तसेच डाळिंब या पिकात खरे सेट होणारे मादी फुले हे ३५ सा वय दिवशी सुरुवात होत असते……कपाशीचे पहिले फुले हे फूल निघाल्यावर ४० दिवसात पूर्णपणे बॉल मधे रूपांतरण करता म्हणजे ८५ दिवसात पिकिंग ला येते तसे डाळिंब या पिकात…….सूर्यप्रकाश,पाणी व्यवस्थापन,पांढरी मुळी चालना,योग्य वेळेस सूत्र कृमी नियोजन,योग्य वेळेस योग्य फवारणी व लिक्विड च सुयोग्य वापर तसेच मधमाशी संगोपन साठी पण रासायनिक अवशेष च वापर फवारणीतून हा कमी करावा…..शेवटी सेटिंग हे नैसर्गिक प्रोसेस आहे ती आपल्या हातात नाही…….वरील या सर्व बाबी आतील तर नक्की आपले फुल हे ५५/६५/७५/११०/१२० दिवसात सेटिंग ही पूर्ण होत असते,तसे भगवा चे फूल निघाल्यानंतर २५/३० दिवस हे घेते पण आरक्ता किवा मृदुला जातीची चे फुले हे निघताना सेटिंग होत असतात. बघा चालू २-३ वर्षापासून शेवगा व सीताफळ उत्पादक हे सेटिंग साठी किती त्रस्त आहेत…….तसेच अवकळी पाऊस व सातत्यपपूर्ण ढगाळ वातावरण हे असेन तर जैविक स्लरी चा वापर हा वाढवावा व काल(१३/०१/२०२६) पैठण भागात पारुंडी गावच्या आसपास पाऊस झाला आहे २/३ इंच ओल इतकी आहे……यामुळे अश्या परिस्तीत घाबरून जाण्याचे कारण नसून…..आपले बागेचे काम हे निरंतर चालू ठेवावे……कर्म हे अपरिहार्य आहे पण कर्माला स्वतः चे कर्तेपण नको यामुळे अभिमान हा दिवंगत होतो व मी केले ही भावना मनात रुजते एवढेच या लेख मधून सांगणे आहे……बाकी काय सांगू आपल्याला अजून,काही चूक भूल शब्दांची किवा आपल्या भावनेची माझ्याकडून झाली असेन तर नक्की क्षमस्व व अर्पण!!! आपला कृषी मित्र, शामकांत महाजन श्री बायो एस्थेटिक्स, फुलंब्री,छ संभाजी नगर 82755 06166!