У нас вы можете посмотреть бесплатно काळी जोगेश्वरी पुणे । Kali Jogeshwari Pune । Pune Devi temple । देवी मंदिर पुणे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी असलेल्या पुण्यातील, थोडेसे दुर्लक्षित, एकमेव, अद्वितीय "काळी जोगेश्वरी मंदिर" 🚩 -------- १) "श्री काळी जोगेश्वरी मंदिर, पुणे" हे दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या समोर, भिडे यांच्या वाड्यात, बुधवार पेठेत, शिवाजी रोडवर असलेले पुरातन मंदिर आहे. रोडवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे मिठाईचे दुकान आहे, जे फारसे प्रसिद्ध नाही, त्याच्या मागे मंदिर आहे, मात्र प्रवेश शेजारच्या गल्लीत वळून करावा लागतो. २) सदर मंदिरची व्यवस्था भिडे यांचेकडे असून नित्य पूजा पाठ, अभिषेक, उत्सव इत्यादी व्यवस्था भिडे कुटुंब वर्षानुवर्षे बघतात. देवीची 2.5 फूट मूर्ती काळया पाषाणाची असून राजस्थान येथून घडवली आहे. देवीचे हातात शंख, चक्र, पद्म आणि अभयमुद्रा आहे. देवीचे वैशिष्ट्य म्हणजे ही एकमेव देवी त्रिनेत्रा (देवीस तिसरा नेत्र आहे) आहे. मूळ मूर्ती मंदिरात असलेल्या औदुंबर वृक्षाखाली मिळाली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करायचा आदेश पूर्वजांना झाला असल्याचे भिडे आज्जीनी सांगितले. ३) वाड्यात देवीसमोर गणपती बाप्पा आहे, त्या गणपतीच्या डावीकडे, म्हणजे देवीच्या समोर, उजव्या हाताचे बाजूस शिवलिंग आणि नंदी आहे. गणेशाच्या उजवीकडे, म्हणजे देवीच्या समोर - डाव्या हाताचे बाजूस कालभैरव आहे. देवीच्या मंदिराच्या डाव्या हातास दत्तात्रेयाचे छोटी घुमटीवजा मंदिर असून, त्यावरच तो औदुंबर वृक्ष आहे. भिडे कुटुंब वाड्यातच राहतात. ४) मंदिरात लाकडाचे 8 ते 10 खांब असून, प्रत्येकावर देवतांचे फोटो आहेत. मंदिरातील "प्रथम खांबावर योगेश्वरी अंबेजोगाईचा फोटो" असून ह्याच मंदिरात नवार्ण मंत्र अर्थासह फ्रेम करून लावला आहे. बीड जवळ अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी ही बहुतांश चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबांची कुलदेवी आहे ५) भिडे यांचा वाडा बुधवार पेठेतील रेड लाइट एरिया म्हणजे वेश्यावस्तीला चिकटून / जवळ असला, तरी देवाच्या दारात लिंग, धर्म, जात, वर्ण ह्यांवर कधीच भेद नसतो, हे कायम लक्षात ठेवा आणि मगच मन भरून मातेचे दर्शन घ्या. मातेची ममता तुमच्या निर्मळ भावनेसाठी कायम सिद्ध असते 🙏🏼 -------------------------------------------------------- 🔱🚩 " श्री जोगेश्वरी भगवती" 🚩🔱 ( ही माहिती आठवणीतील पुणे या पेज वरुन घेतली गेली आहे.)