У нас вы можете посмотреть бесплатно पहिल्यांदाच जोडीने गेलो सिद्धिविनायक मंदिर दादरला दर्शनासाठी | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पहिल्यांदाच जोडीने गेलो सिद्धिविनायक मंदिर दादरला दर्शनासाठी | @AnjaliMore-i8d #siddhivinayaktemple #vlog #dailyvlog सिद्धिविनायक. श्री गणेशाच्या अनेक लोकप्रिय रुपांपैकी विशेष असे रुप आहे. गणपतीच्या या रुपाचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उजव्या सोंडेच्या गणपतीच्या स्वरुपाला सिद्धपीठ असे संबोधले जाते. म्हणूनच गणपतीच्या या स्वरुपात स्थापित झालेल्या मंदिरांना सिद्धिविनायक मंदिर असे म्हटले जाते. उजव्या सोंडेच्या गणपतीचे व्रत आचरणे कठीण असते, असे मानले जाते. कारण ते योग्य पद्धतीने आणि कर्मठपणाने आचारावे, असे सांगितले जाते.मूळातील सिद्धिविनायकाचे मंदिर हे खूप छोटे होते, असे सांगितले जाते. घुमटाकार रचना असलेले या मंदिराचे बांधकाम सुरुवातीला विटांचे होते. या मंदिराचा जीर्णोद्धार करून या मंदिराला भव्य स्वरुप देण्यात आले. या मंदिराचे बांधकाम १९ नोव्हेंबर १८०१ मध्ये झाले. या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे अर्थसहाय्य एका महिलेने केले होते. या महिलेला मूल नव्हते. म्हणून गणपती मंदिराला सढळ हस्ते मदत करण्याचा निर्णय तिने घेतला. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेली कोणतीही महिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळावा, अशी तिची इच्छा होती.सिद्धिविनायकाची मूर्ती ही पाषाणाची आहे. याची सोंड उजव्या बाजूला आहे. या मंदिरात पत्नी रिद्धी आणि सिद्धीसह गणपती विराजमान झाले आहेत. गणपतीचे हे स्वरुप अत्यंत मनमोहक, प्रसन्नता देणारे आणि मनःशांतीदायक असेच आहे. सिद्धिविनायकाच्या केवळ दर्शनाने मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. सिद्धिविनायक मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची द्वारे सर्वांसाठी खुली आहेत. कोणत्याही जाती, धर्म, पंथाच्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश दिला जातो.भारतातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी कोट्यवधी रुपये भाविकांकडून दान स्वरुपात मिळतात. शिवाय अनेक वस्तू सिद्धिविनायक चरणी अर्पण करतात. या मंदिराचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त मंडळही देशातील श्रीमंत विश्वस्त मंडळाच्या यादीत समाविष्ट आहे. या मंदिराकडून अनेक लोकोपयोगी, समाजपयोगी कामे केली जातात. अनेकांना आर्थिक मदत केली जाते. राज्यात संकटकाळी सिद्धिविनायक सामान्यांच्या मदतीला धावून जातो. #marathivlog #siddhivinayaktemple #dailyvlog #viralvideo