У нас вы можете посмотреть бесплатно Budhwar Peth Pune Police | पोलिसांनीच तरुणीला बुधवार पेठीतील कुंटणखान्याला विकलं | Pune или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#pune #humantrafficking #policescandal #budhwarpet #faraskhana #womeninsafety #policescandal #crimenews #budhwarpeth #humanrights #crimeupdate #Justice#maharashtra #lokshevay #lsmarathi #breakingnews #viralnews #policecorruption #maharashtrapoliceexam #SensationNews #punenews कुंपनानेच शेत खाल्लं, अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, असाच प्रकार आता पुणे पोलीस दलात उघडकीस आलाय, पोलिसांनीच एका बांगलादेशी तरुणीला सौदा करून कुंटणखाना मालकीनीला विकल्यानं खळबळ माजलीय...पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मदतीसाठी स्वतः पोलिस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप महिला पोलिस कर्मचाऱ्यावर झाला असून संबंधित महिला पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली. मात्र, मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलिस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीत नेले. तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आले. त्यानंतर महिला पोलिस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे. या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले, मात्र महिला पोलीस कर्मचारी एका तरुणीसोबत असं कसं करु शकातात? पुणे पोलिसांना गुन्हेगार आवरणं तर अवघड झालंच होतं...आता पुन्हे पोलीस चक्क तरुणींचे सौदेही करायला लागल्याचे प्रकार समोर आल्यानं खळबळ माजलीय...पुण्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची लख्तरं पुन्हा वेशीवर आली आहेत... ( pune police brothel scandal, bangladeshi girl trafficked, manisha pukale suspended, budhwar peth prostitution ring, faraskhana police station corruption, human trafficking maharashtra, police misconduct pune ) Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi. 🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच! Website: https://www.lokshevay.com Instagram: / lsmarathi Facebook: / lsmarathi Twitter (X): https://www.x.com/lsmarathi WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...