У нас вы можете посмотреть бесплатно पळशीकरांचा रहस्यमय वाडा 😳,पळशी ता.पारनेर,जिल्हा - अहमदनगर,# Palashi, Parner, Dist- Ahmednagar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पळशीकरांचा वाडा:- टाकळी ढोकेश्वर - पळशी अंतर २५ किलोमीटर आहे. पळशी नदीच्या काठी पळशीचा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्यात असलेल्या पळशीकरांच्या वाड्यात लाकडावर केलेले अप्रतिम कोरीवकाम पहाण्यासारखे आहे. पळशी किल्ल्याबाहेर असलेले विठ्ठल मंदिरही अप्रतिम कोरीवकामाचा नमुना आहे. पळशी गाव जवळ यायला लागल्यावर किल्ला दिसायला लागला. पळशीच्या भुईकोटाला १६ बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. त्यातील २ दरवाजे मोठे असून दोन दरवाजे लहान आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला आणि पूर्वेला असलेल्या मोठ्या दरवाजातून थेट गाडी घेऊन किल्ल्यात जाता येते. किल्ल्यात गाव वसलेले असल्याने किल्ल्याच्या उत्तर भागात पक्के रस्ते बनवलेले आहेत. किल्ल्यात शिरल्यावर चौफ़ेर वस्ती दिसते. या वस्तीतून महादेव मंदिराकडे चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. या मंदिराचे दगडी बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या मागच्या भिंतीवर हनुमान कोरलेला आहे. पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा आहे. या वाड्याचा दरवाजा आणि त्याची चौकट यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर एक बोळ लागतो. तो पार केल्यावर डाव्या बाजूला वाड्याचे दुसरे दार आहे. त्यातून आत गेल्यावर आपण वाड्याच्या चौकात प्रवेश करतो. वाड्यात सध्या दोन भाडेकरु राहातात. वाडा बांधला तेंव्हा दुमजली होता पण आज केवळ एकच मजला शिल्लक आहे. चौकात शिरल्यावर वाड्याच्या खांबांवर, हस्तांवर केलेले अप्रतिम नक्षीकाम पाहायला मिळते. वाड्याला तळघर आहे पण ते सध्या बंद केलेले आहे. चौकात मोरी असून त्यात एक दगडी पाट आहे. वाड्यात शिरल्यावर उजव्या बाजूला देवघर आहे. त्यात जुने टाक आणि मुर्ती आहेत. देवघरच्या बाजूला असलेल्या खोलीच्या चौकटीवर कोरीवकाम केलेले आहे. याच खोलीत वाड्यातील आड आहे. पळशी हे गाव आपल्या लाकडी कोरीव काम इतरांपेक्षा वेगळे ठरते. कारण पळशी गाव हे लाकडी कोरिव कामामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात जग सर्वोच्चतेचं परिमाप आहे. गावात प्रवेश करताच आपल्याला प्रचंड मोठे गडासारखे प्रवेशद्वार दिसते ते इतके प्रचंड आहे की, त्यामधुन मोठ्ठी वाहने देखील सहज प्रवेश करू शकतात. संपुर्ण गाव हे याच दगडी तटबंदीच्या आतमध्ये वसलेलं आहे. या तटबंदीला ऐकुन १६ बुरूज आणी ४ प्रवेशद्वार आहेत. हा वाडा मल्हारराव होळकर यांचे दिवाण रामराव कृष्णराव कांबळे-पळशीकर यांच्या मालकिचा आहे. ते सध्या मध्यप्रदेश इथे स्थायिक झालेले आहेत. वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपली संस्कृती किती महान आणि व्यापक, भव्य होती याची प्रचिती येते. या वाड्यामध्ये जे लाकडी नक्षीकाम आहे त्याची तुलना कशा सोबतच नाही होऊ शकत. वाड्यात ऐक बालाजी मंदिर आहे. वाडा हा २ मजली आहे. वाड्याला तळघर आहे जे सध्या बंद केलेले आहे. वाड्यामधुन २ गुप्त मार्ग आहेत. जे वाड्या मागील २ वेगवेगळ्या मंदिरात जातात. वाड्यात ऐक पुर्वीची छोटी विहीर आहे. ज्याचं पाणी मात्र खारट आहे. वाडा हा २ मुख्य चौकात विभागला आहे. आणि वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वाड्याचे सर्वात सुंदर कोरिव लाकडी खांब पाहायला मिळतात. तसेच आणखी ऐक बैठकीची जागा आहे. जिथे पुरातन काळातील चित्रे भिंतीवर काढलेली आहेत. विहीरीतील पाणी खारट तर आहेच सोबत त्या वाड्यामध्ये ऐक छोटीशी साधारण ५ इंच अशी वस्तु आहे जी केवळ अद्भुत आहे. कारण तिथे ऐक पात्र आहे ज्यामध्ये २ मुर्त्या आहेत. उभी जी मुर्ती आहे ती वासुदेव मुर्ती आहे आणि वासुदेवाच्या हाता मध्ये बाळकृष्णाची झोपलेली मुर्ती आहे या पात्राचे वैशिष्ट्य असे आहे कि त्या पात्रांमध्ये पाणी भरल्यानंतर त्याच्या खालच्या भागाला ऐक छिद्र आहे तरी सुद्धा त्यामधुन पाणी बाहेर पडत नाही. मात्र त्याच पात्राच्या बाळकृष्णाच्या पायाला पाणी लागताच पाणी लगेच त्याच छिद्रामधुन गळु लागते. Palashikar Wada:- This land fort is located in Parner taluka of Ahmednagar district on the banks of the river Palashi. There is a residence of Holkar family inside the fort and the wooden carvings in this mansion is worth looking. The temple of Lord Vitthal outside the fort also has some beautiful carvings. Further we come across the mansion of Palshikar family. The current descendants of the Palshikars, Mr. Ramrao Krishnarao Palshikar is the owner of this mansion. There are beautiful carvings on the mansion doors and arches. After entering this door we come in an alley, crossing which there is another door of the mansion. Entering this we step in the central part of the mansion. There are currently two tenants living here. The mansion was originally two storied but now only floor remains. Beautiful carvings on the wooden pillars can be seen here. There is an underground room in the mansion but it is kept locked. There is a worshipping area to the right. The pillar on the first floor has been carved in the shape of a palm tree. As the second floor of the mansion is in ruins it has been covered by a roof. Overall the mansion has been poorly maintained. As we move out we can see the ruins of another mansion. Only two walls of this are left but the corners are worth seeing. A path in between these two mansions goes to the temple of a Goddess who has hooded King Cobra on her head, an Elephant to her feet, a mace and a wheel in her hands. Heading back to the Lord Shiva temple, keep the temple facing your back and move ahead. In 5 minutes you will reach the east door through a small unpaved road. There are two strong bastions on the either side of the door. The bank of the river Palashi is outside this door at a distance.