У нас вы можете посмотреть бесплатно Gondeshwar Temple | गोंदेश्वर महादेव, सिन्नर | Sinnar | Ancient Temple | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Gondeshwar Temple | गोंदेश्वर महादेव, सिन्नर | Sinnar | Ancient Temple | #backpacking #zunzarmachi चिखलघाम आणी सह्याद्री ! राज्यात सातवाहनांनी जी काही शहरे वसविली त्यापैकी एक सीरीनगर म्हणजे सिन्नर. नंतर राष्ट्रकूट आणि पश्चिमी चालुक्यांचाही प्रभाव या शहरावर राहिला. शहराचे वर्णन सांगणारे अनेक पौराणिक, सातवाहनकालीन, राष्ट्रकूट आणि पश्चिमी चालुक्यांशी निगडित असणारे संदर्भ सापडतात. सातवाहनांच्या काळापासून पार पेशव्यांच्या कालखंडा पर्यंत, मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक सत्ताकारणाचा वारसा सिन्नरला लाभला. पौराणिक काळात मौनीनाथांच्या चरित्रात या शहराला ब्रह्मपुरी सुद्धा संबोधलं आहे. इ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले. व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार केला त्यावेळेस सिन्नर हि राजधानी होती आणि अगदी १२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती. सिन्नरचा इतिहास जेवढा अनोखा आहे. तेवढीच तेथील मंदिरेही देखणी आहेत. महाराष्ट्र भूमीवर दुर्मिळ आणि प्राचीन मंदिरांचा खजिना आहे. यापैकी सिन्नर येथील पंचायतन प्रकारातीत गोंदेश्वर मंदिर एक. दक्षिण शैलीतील भूमिज स्थापत्यशास्त्रातील बांधकामाचा हा एक उत्तम नमुना आहे. पुरातन गोंदेश्र्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणता येयील. हे मंदिर १२ व्या शतकात यादव राजा राजगोविंद याच्या कालखंडात बांधलं म्हणून गोविंदेश्वर आणि नंतर अपभ्रंश होऊन गोंदेश्वर झाले असा अंदाज अभ्यासक लावतात मंदिराची संरचना स्वर्गमंडप, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप व अंतराळ व गर्भगृह अशी असून गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे. मंदिराला विस्तृत आवार आहे. समोरच्या स्वर्गमंडपाची थोडी पडझड झाली असली तरी त्याचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही. वर वर्तुळाकार आकाश न्याहाळतानाचा अनुभव खासच आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी या मंदिरात येऊन गेल्यामुळे आजही महानुभाव पंथाचे अनुयायी इथे येतात आणि या पवित्र स्थानाचा दर्शन घेतात. I wish you a wonderful day and ....... I will meet you on Instagram ► / ran_kida --------------------------------------------------------------------------------------------------- #temple #mandir #sinnar #nashik #khandeshi #khandesh #akole_sangamner #sangamner #sambhajinagar #sahyadri #marathiyoutuber #marathivlog #marathi #maharashtra #maharashtratourism #forts #maratha #shivajimaharaj #sambhajimaharaj #pravasvarnan #bha2pa #bhadipa #bolbhidu #raanvata #jkv #sahyadrimountains #trekkinglovers #treks