У нас вы можете посмотреть бесплатно बालसभा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रित्यर्थ वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर बुद्रुक मुली येथे इयत्ता चौथीच्या वर्गाने बाल सभेचे आयोजन केले आणि उत्कृष्टरित्या ही बालसभा पार पाडली.बालसभेचे अध्यक्ष स्थान कुमारी बुशरा सिकंदर शेख हिने भूषवले तर, प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी गितांजली शरद व्यवहारे, लावण्या प्रधान आणि मेहेक शेख या उपस्थित राहिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी आयेशा लातिफ सय्यद हिने केले.अध्यक्ष सूचना कुमारी श्रद्धा प्रशांत खरोटे तर, अनुमोदन कुमारी सोनाली विजय अमोलिक हिने दिले.संपूर्ण कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला.सन्माननीय पाहुण्यांचे व अध्यक्ष यांचा सत्कार ,पालकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी मनोगते, शिक्षक मनोगते आणि पालक मनोगते झाली .त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी एक इंग्लिश नाटिका सादर केली शेवटी कुमारी प्रांजल राजू दांडगे हिने आभार मानले आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले. अतिशय उत्कृष्ट रीतीने कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता चौथीच्या वर्गाने केले त्याबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती बनसोडे ,मॅडम श्रीमती दहिवाळ मॅडम ,श्रीमती सोनवणे मॅडम आणि श्रीमती परदेसी मॅडम यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. बाल सभेच्या निमित्ताने विद्यार्थिनींना सभेची पूर्वतयारी कशी करावी ?सूत्रसंचालन- प्रास्ताविक म्हणजे काय असते? फलक लेखन, सभेची बैठक व्यवस्था, सत्कार कशाप्रकारे करावा? याबद्दल माहिती मिळाली. त्याचबरोबर सभाधीटपणा वाढण्यास मदत झाली.