У нас вы можете посмотреть бесплатно Nehru Planetarium Mumbai In Worli | नेहरू तारांगण (2019) | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुंबईतील वरळी येथील नेहरू तारांगण आपल्याला एका अद्भुत दुनियेत घेऊन जाते. आकाशदर्शनाचा एक रोमांचक अनुभव तिथे घेता येतो. त्यातूनच अनेकांचे कुतूहल जागे होते. त्यातील काहीजण संशोधक किंवा प्राध्यापक होतात, तर काही विज्ञानप्रसाराचा वसा घेतात... ...... वरळीतील नेहरू तारांगण हे मुंबईतील रहिवाशांकरिता आणि पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. महालक्ष्मी मंदिराकडून हाजीअलीचा दर्गा पार करत पुढे आलात की उजवीकडे नेहरू सेंटरची १६ मजली गोल इमारत डोळ्यात भरते. थोडं जवळ आल्यास गोल इमारतीच्या पुढील छोटेखानी घुमट आपल्याला वेगळ्याच विश्वात नेणार, याची खात्री पटवतो. सन १९७५मध्ये पी. जी. पटेल यांनी जर्मनीहून कार्ल-झाइस कंपनीचा तारांगणाचा प्रोजेक्टर विकत आणला. तो अडकला सीमा-शुल्क विभागात. तो सोडवून घेतला रजनीभाई पटेल यांनी. त्यावेळी रजनीभाईंचा वरळी येथे नेहरू सेंटर सुरू करण्याचा मानस होता. अखेर नेहरू सेंटर तर्फे शैक्षणिक उपक्रम म्हणून तारांगण सुरू करावे असे ठरले. पण ही विज्ञानगंगा मुंबईत आणायची ती कोणाच्या बळावर? सुदैवाने त्यावेळी टी.आय.एफ.आर. येथे असलेले डॉ. जयंत नारळीकर डॉ. कुमार चित्रे व डॉ. बालू यांनी त्यासाठी मदत करायचे आश्वासन दिले. प्रख्यात वास्तुविशारद कादरी यांनी या वास्तची रचना करण्याचे मान्य केले. मुख्य अडचण होती, ती संचालकपदासाठी विज्ञानाच्या प्रसाराची आवड असणारा संशोधक शोधण्याची. डॉ. अरविंद भटनागर या सौर शास्त्रज्ञाच्या रूपाने ती पूर्ण झाली. अनेक अडचणींवर मात करत दि. ३ मार्च १९७७ रोजी मुंबईत नेहरू तारांगणाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले. आज २६ वर्षांनंतरही तारांगणातर्फे खगोल विज्ञानाची गोडी लावण्याचे कार्य अविरत सुरू आहे. तर मित्रांनो तुम्हाला आकाशातील ग्रह , तारे , आकाशगंगा यांच्या बद्दल माहिती मिळवण्यासाठी नेहरु तारांगण ला नक्की जावा Own music (No Copyright music)