У нас вы можете посмотреть бесплатно | भारतातील सर्वात प्राचीन बौद्ध लेणी | पितळखोरे लेणी पाटणादेवी | हेमाडपंथी महादेव मंदिर | Chalisgaon или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
| पाटणादेवी मंदिर | हेमाडपंथी महादेव मंदिर | पितळखोरे लेणी भटकंती | Patnadevi Temple Chalisgaon | ------------------------------------------------------------------------------- नमस्कार... या व्हिडिओ मध्ये आपण भारतातील प्राचीन अशी पितळखोरे येतील बौद्ध लेणी बघीतल्या आहेत. पितळखोरे येथे 14 बौद्ध लेणी आहेत. ज्यांचा समावेश महाराष्ट्रातील आद्य मठांमध्ये केला जातो. या सर्व लेणी हिनयान कालीन असुन लेणी क्र. 3 मधील केवळ चित्रांमुळे महायान कालखंडाचे अस्तित्व दिसुन येते. लेणी दोन समुहांमध्ये विभाजित असुन दरिच्या उजव्या बाजूस प्रथम तर डाव्या बाजूस द्वितीय समुह आह... ह्या व्हिडिओ मध्ये माहिती न मिळाल्यामुळे माझ्याकडुन बौद्ध लेणी असे उल्लेख करायचा राहील्या मुळे मी मनापासून माफी मागतो...🙏🙏🙏 ------------------------------------------------------------------------------- अशाच ट्रेकिंग, गडकिल्ले भटकंती, पर्यटन स्थळांचे व्हिडिओ पाहण्यासाठी Channel ला Subscribe करा. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत पाटणादेवी व पाटणादेवी च्या आस पास चार परिसर... 1- चंडिका देवी मंदिर पाटणादेवी हे जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या 18 किमी अंतरावर असणारे हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भावीक येत असतात. पाटणादेवी मंदिर चाळीसगाव एस्टी स्टॅन्डवरून सकाळी साडेसातपासून दर तासाला पाटणादेवीच्या बसेस सुटतात. निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्ति चंडिकादेवीचे मंदिर आहे. मंदिराची रचना हे मंदिर 12 व्या शतकात उभारले गेले आहे. राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. देवळासमोर दोन भल्यामोठ्या दगडी दीपमाळा आहेत. शुन्याचा आविष्कार करणाऱ्या भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला असा एक शिलालेख भारतीय पुरातत्त्वखात्याला मिळाला आहे. वनखात्याने मंदिराजवळच भास्कराचार्य निसर्ग केंद्र उभारले आहे. हे केंद्र सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत पर्यटकांसाठी खुले असते. पाटणादेवीच्या आसपास कन्हेरगड, हेमाडपंती महादेव मंदिर धवलतीर्थ धबधबा, पितळखोरे लेणी, सीता न्हाणी लेणी, शृंगारचौरी लेणी, जैनांची नागार्जुन लेणी आणि गौताळा अभयारण्य आहे. ------------------------------------------------------------------------------- 2- हेमाडपंती महादेव मंदिर. हे मंदिर १२ व्या शतकातील आहे. या मंदिराचे निर्माण एका भव्य अशा १० फूट उंचीच्या ओट्यावर झालेले प्रथमदर्शनी वाटते. त्याची लांबीच जवळपास १०० फुटांपर्यंत आहे. नंदीगृह , सभागृह व गर्भगृह अशी मंदिर रचना आहे. नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले दोन जवळपास दहा फूट उंचीचे नक्षीदार खांब आहेत. मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे. इतर २४ लहान खांबांवर सभामंडपाची उभारणी केलेली आहे. प्रत्येक खांब प्रमाणबद्ध असून सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे. तसेच गर्भगृहाच्या डाव्या बाजूला एक सुंदर शिलालेख आढळतो. स्तंभांवरील कोरीवकाम अप्रतिम असून अनेक शिल्पे झिजलेल्या अवस्थेत आहेत. काहींचे मूळ स्वरूप लक्षात येत नाही. संपूर्ण मंदिर बाहेरील बाजूने कोरलेल्या मुर्त्यांनी सजवले आहे. या मुर्त्यांमधे अनेक मुद्राभाव असलेली शिवाची, गणेशाची शिल्पे आहेत. बाहेरील खांबाच्या खालच्या पट्टीवर हत्तीशिल्पे दिसून येतात. पण दुर्दैवाने त्यातील एकही हत्ती आज पूर्णपणे शिल्लक नाही. एकेठिकाणी कोरलेली चामुंडा देवीची मूर्ती दिसते. त्यात तिने पायांजवळ दोन दैत्यांचा केशसंभार पकडून त्यांना शरण आणले आहे. पायाखाली एका दैत्याला दाबले आहे, तर मांडीवर एक दैत्य जीवदानाची याचना करत आडवा पडलेला आहे. ------------------------------------------------------------------------------- 3 - पितळखोरे लेणी ही शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी बौद्ध लेणी असल्याचे मानले जाते. रचना या लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्याची चित्रे आहेत. भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठीत आणि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तीनी चितारलेले, सजवलेले आहे. मुंडन केलली मुले व बुटक्या मूर्ती गुढघे टेकून वंदन करताना दिसतात. स्त्री-पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात. (या चित्रांचा काल गुहेपेक्षा अर्वाचीन दिसतो.) चैत्य लेणे क्र.३ आणि विहार लेणे क्र. ४ यांच्या दर्शनीय भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणे क्र. ४ येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजथर आहे. हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लोंबताना दिसतात. या लेण्याच्या प्रवेश द्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या राजदंपतीने भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळेच महत्त्व प्राप्त करून घेतले आहे. ------------------------------------------------------------------------------- #Patnadevivlog #chalisgaon #khandesh #sagarnikamvlog ✌️Subscribe & Follow 👇 YOUTUBE - / @sagarnikamvlog INSTAGRAM - instagram.com/mrsaagar_ audio source YouTube library I hope you enjoyed this travel video Subscribe this channel 👍 Thank you ☺️