У нас вы можете посмотреть бесплатно फोनपेवरून ८४ हजारांची फसवणूक : अंबाजोगाई पोलिसांची तात्काळ कारवाई, दोन तासांत आरोपी जेरबंद* или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फोनपेवरून ८४ हजारांची फसवणूक : अंबाजोगाई पोलिसांची तात्काळ कारवाई, दोन तासांत आरोपी जेरबंद नमस्कार! मो———-गुन्हेशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या चॅनेल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते! मोबाईल पेमेंट अॅपद्वारे वाढत चाललेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये आणखी एक घटना अंबाजोगाई शहरात समोर आली आहे. फोनपे अॅपच्या माध्यमातून तब्बल ८४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. मात्र या घटनेनंतर अवघ्या दोन तासांत अंबाजोगाई शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून ७४ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली. पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोळकानडी (ता. अंबाजोगाई) येथील रहिवासी आणि व्यवसायाने गॅरेज चालक असलेल्या सोमनाथ मदन ढगे यांची ही फसवणूक झाली होती. त्यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अविनाश शंकर देवकर (रा. वडारवाडा) आणि अझर अब्दुल रहमान पठाण (वय ३२, रा. पेन्शनपुरा) या दोघांनी मिळून फोनपे अॅपद्वारे ही रक्कम फसवणूक करून हस्तगत केली होती. या प्रकरणी २२ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा मागोवा घेऊन पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोलिस उपनिरीक्षक शिंदे आणि त्यांच्या पथकाने जलद हालचाली करत अवघ्या दोन तासांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७४,००९ रुपये जप्त करण्यात आले. या आरोपींवर यापूर्वीही जबरी चोरीसह इतर गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली. पोलिस अंमलदार श्रीकृष्ण वडकर, मनोज घोडके, रवीकुमार केंद्रे, हनुमंत लाड, हनुमंत चादर, पांडुरंग काळे आणि भागवत नागरगोजे यांच्या मेहनतीतून ही जलद कारवाई शक्य झाली. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई पोलिसांची ही तत्परता आणि कार्यक्षमता खरोखरच कौतुकास्पद आहे. #gunheshodh #maharashtrapolitics #news #maharashtranews #dcmajitpawar #bjp #mahavikasaghadi #marathinews #pmnarendramodi