У нас вы можете посмотреть бесплатно होळी उत्सव, आंबेत, म्हसळा, रायगड или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार... 🙏 यंदाचा होळी उत्सव आदल्या दिवसापासूनच अतिशय रंगतदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. पालखी मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र त्या दरम्यान एक छोटासा विषय निर्माण झाला. ती बाब गावाने मान्य केली आणि त्यावर सर्वांनी आपापली मते मांडून शेवटी सर्वांच्या सहमतीने त्यावर मार्ग काढून विषय पूर्णत्वास नेण्यात आला. *कदाचित आपण हाती घेतलेल्या ग्रामदैवत श्री बापदेव महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यासाठी आपल्या सर्वांची मानसिक तयारी आणि एकजूट तपासण्याची ही एक प्रकारची सत्वपरीक्षा असावी. परंतु पुढे सर्वांनी एकमेकांना समजून घेत संयमाने व एकमताने पुढील नियोजित कार्यक्रम आणि उत्सव अतिशय उत्साहात पार पाडला*. *पुढील काळात अशा सर्व बाबींमध्ये अधिक दक्षता घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नेहमीप्रमाणे एकजूट आणि संघभावना कायम ठेवत आपल्या ग्रामदैवत श्री बापदेव महाराज मंदिर बांधकामाचे कार्य एकमताने आणि सर्वांच्या सहकार्याने पुढे नेऊया*. *आपल्या सर्वांवर श्री बापदेव महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे घडलेल्या प्रसंगाचा या पवित्र कार्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा पूर्ण विश्वास आहे. कोणीही मनात कोणताही किंतु-परंतु न ठेवता हे आपल्या ग्रामदैवताचे कार्य समजून या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करत राहावे ही नम्र अपेक्षा आहे*. अनुभवातून मिळणारे यश हे अधिक परिपक्व आणि दीर्घकालीन असते. पुढील नियोजन व आढावा ट्रस्ट व मुंबई कमिटी संयुक्तपणे लवकरच आपणा सर्वांसमोर सादर करतील. धन्यवाद...!!!!!