У нас вы можете посмотреть бесплатно श्री देव जैतिर कवळास उत्सव 2021 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
माझा गाव : तुळस - तालुका वेंगुर्ला. !!!...इतिहास...!!! ऐतिहासिक वारसा –विष्णूच्या सानिध्यात असलेले सुंदर हरित गाव. श्री देवी सातेरी आई ही भूमी मधून प्रकट झालेली असून नाग कनेच्या स्वरूपात वारूळ या रूपाने दर्शनास पहावयास मिळते. श्री जैते परब हे विष्णू चे खूप मोठे भक्त होते आणि त्यांच्या देवा वरील अफाट भक्तीने साक्षात भगवान विश्नू श्री देव जैतीर या स्वरूपात पहावयास मिळतात . वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावची ग्रामदेवता श्रीदेव जैतीर हे दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून सुपरिचित आहे. तुळस गावात जैते परब या नावाचे महापुरुष होते. ऐतिहासिककाळाला अनुसरून ते दांडपट्टा खेळणारे व तलवार बहाद्दूर शूरवीर होते. त्यामुळे सावंतवाडी संस्थान सरकारने त्यांची एका गडावर किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती. त्यांना एकुलती एक मुलगी होती. व त्यांनी तिचे लग्न करून दिले होते. सुभेदारीवरून येत असता आपल्या मुलीस माहेरी आणावी या इराद्याने ते तिच्या सासरी गेले. परंतु बरोबर कुळंबीण नसल्याने मुलीच्या सासरच्या मंडळींनी तिला बापाबरोबर एकटी पाठविण्याचे नाकारले. त्यावर तुळस मुक्कामी येऊन त्यांनी आपल्याबरोबर गावचा नागल महार व कुळंबीण यांस घेतले व पुन्हा मुलीच्या सासरी जाण्यास निघाले. वाटेत त्यांची सह्याद्रीपट्टयातील रांगणाघाट येथे भिल्ल लोकांशी गाठ पडली. बरोबरची कुळंबीण व तिच्या अंगावरचे दागिने पाहून तिला पळवून नेण्यासाठी भिल्लांनी त्या तिघांना वेढले. त्यामुळे त्याठिकाणी दोन्ही पक्षांची बरीच चकमक उडाली. या चकमकीत जैते परब यांनी आपल्या तलवारीने बऱ्याच जणांना कंठस्नान घातले. तलवारीपुढे आपला बचाव लागत नाही, असे पाहून भिल्ल लोक रानात पळाले. आणि झाडाआड लपून ते तीरकामटयांनी बाण सोडू लागले. बेरडांच्या गनिमीकाव्यापुढे जैतोबांचा इलाज चालेना. अशा परिस्थितीत सोबतच्या कुळंबीणीस बाण लागून तिचा मृत्यू झाला. त्याचवेळी एक बाण जैतोबांच्या मस्तकात लागल्यामुळे ते घायाळ झाले. त्यांची ती असहाय्य स्थिती पाहून त्या भिल्लांनी गतप्राण कुळंबीणीच्या अंगावरील दागिने काढून घेतले व ते पसार झाले. याउपर नागल महाराने जैतोबांच्या डोक्यास पट्टी बांधून त्यांना आपल्या पाठीवर घेतले व तो तुळस गावी येण्यास निघाला. नागल महाराने आपल्या जखमी धन्याला घेवून येत असता पहिला मुक्काम नारूर येथे केला. घडलेली घटना लक्षात घेऊन नारुर गावच्या सुद्रीक या आडनावाच्या एका वैश्य सद्गृहस्थाने जैतोबांना आपल्या घरी नेऊन औषधोपचार केला व त्यांची सुश्रुषा केली. परंतु बाणाने झालेली जखम तीव्र असल्याने त्यांचा प्राण वाचण्याची आशा दुरावली. ही बातमी तुळस गावी समजताच जैतोबांची पत्नी, नातेवाईक व तुळस गावचे इतर लोक नारूरला धावत गेले. परंतु वैशाख वद्य १४ रोजी त्यांचे देहावसान झाले. त्याच दिवशी त्यांनी सुद्रीक अंगी संचार केला आणि आपल्या अंत्यसंस्कार वगैरेबाबत सूचना दिल्या. तिथून आपल्या धन्याचे शीर घेऊन नेमळेमार्गेयेत असता नागल महाराने आपल्या हातातील दांडा नेमळे गावच्या सीमेवर टेकला. आज त्या ठिकाणाला ‘दांडयाचे गाळू’ असे नाव पडले. तिथून पुढे मार्गक्रमण करत असता धाटीचो बाजार या ठिकाणी त्याने आपली कांबळी (घोंगडी) टाकली व बैठक मारली. त्या ठिकाणाला वीराची कांबळी म्हणून ‘कांबळेवीर’ असे नाव पडले. तिथून पुढे चालत येत असता थकला भागला नागल महार वजर वहाळावर आपली तृषा भागविण्यासाठी पाणीप्याला. त्यामुळे त्या गावाला ‘वजराट’ असे संबोधले जाऊ लागले. पुढे तुळस गावी येण्यासाठी मार्गक्रमण करत असता तुळस काटया वडाच्या ठिकाणी आपली मांडी टेकली. त्या ठिकाणी मांडी या नावाने घुमटी बांधण्यात आली. लागलीच आता जेथे देवघर उभेआहे ते राऊळांचे घर होते. त्या घरात नागल महाराने आपल्या धन्याचे शीर ठेवले. नारूर गावच्या लोकांनी जैतोबाचे शव आणून ज्याठिकाणी समाधी बांधली त्याठिकाणी भव्यदिव्य असे मंदिर उभे आहे. आणिमंदिरासमोर आपल्या संरक्षणासाठी माझी समाधी बांधावी, अशी इच्छा प्रकट केल्यामुळे नागल महाराचे पाषाण जैतीर मंदिरासमोर स्थानापन्न आहे. हरिजन समाजाला देवस्थानामध्ये त्यामुळेच मोठा मान आहे. ‘नराचा नारायण’ अर्थात माणसाचा देव होऊन पंचायतन देवस्थानाची सूत्रे सांभाळणारे दक्षिण कोकणातील हे एकमेव देवस्थान असावे. हरिजन समाजाला या देवस्थानी मोठा मान आहे. माणसाचा देव होऊन पंचायतन देवस्थानची सूत्रं सांभाळणारं दक्षिण कोकणातील हे एकमेव देवस्थान असावं. तुळसप्रमाणेच नारूरमध्ये होणा-या उत्सवात जैतिर भक्तांना दर्शन देण्यासाठी जेव्हा येतो, तेव्हा काळे कपडे परिधान करणं निषिद्ध मानलं जातं. गेल्या वर्षी हा उत्सव १५ दिवस चालला होता. जैतिर जोपर्यंत सूचना करत नाही, तोपर्यंत कवळास (जनता दरबार) होत नाही आणि जनता दरबार झाल्याशिवाय उत्सवाची सांगता होत नाही, अशी परंपरा इथे पाळली जाते. उत्सव : वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावची ग्रामदेवता श्रीदेव जैतीर मंदिरात अनेक धार्मिक तसेच सांस्कृतिक उत्सव साजरे केले जातात. येथे साजरा करण्यात येणारा जैतिर उत्सव हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. नारूर गावातील खापरा उत्सवाच्या समाप्तीनंतर या उत्सवाला सुरुवात होते. वार्षिक जत्रा आणि श्री देव जैतीर- कवलास वार्षिक उत्सव हा ११ दिवस होतो . पोस्ट करणाऱ्याचे नाव - सुर्यकांत आनंद गोलम इमेल आयडी – [email protected]