У нас вы можете посмотреть бесплатно DHANGAR ARAKSHAN I ऊठ धनगरा जागा हो, एकतेचा धागा हो или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ऊठ धनगरा जागा हो; एकतेचा धागा हो महाराष्ट्र आज महाराष्ट्रातील धनगर समाज विचित्र कोंडीत सापडला आहे.ही कोंडी केलीय तोंड देखल्या दंडवत करणाऱ्या राज्यातील तमाम राजकारण्यांनी. ते तोंडी न्यायाची भाषा करतात आणि दुसरीकडे मात्र राजकारणाच्या नशेत चोवीस तास धुंद असणारी ही मंडळी प्रत्यक्षात अन्याय करतात.गेल्या ७५ वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीचे (एसटी) प्रमाणपत्र मिळावे यासाठी ओरड करतो आहे.यासाठी सर्वपक्षीय पाठींबा आहे.मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी कोणताच पुढारी वा पक्ष यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाही. केवळ पोकळ आश्वासनांची गाजरं दाखवण्यात दंग आहेत. मुळात हा मुद्दा आरक्षणाचा नाहीच, तर तो आहे 'अंमलबजावणी'चा! तरीही संविधानाने दिलेला अधिकार नाकारण्याचे पाप हे शासन कोणत्या तोंडाने करत आहे, हेच आम्हाला समजेनासे झाले आहे. कागदावर 'धनगड' आणि प्रत्यक्ष व्यवहारात 'धनगर' हा जो काही अक्षम्य घोळ घालून ठेवला आहे, तो निस्तरायला काय हिमालयातून कुणी अवतार घेणार आहे काय? या एका अक्षराच्या फरकापायी लाखो धनगर बांधवांच्या नशिबाचं पार मातेरं झालं आहे. हा केवळ तांत्रिक प्रश्न नसून या समाजाच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. पण सत्ताधिशांना त्याचे काय सोयरसुतक आहे? राज्यकर्त्यांना खरोखरच हा प्रश्न सोडवायचा आहे की केवळ निवडणुकीच्या बाजारात मतांची 'मेंढरं' हाकायची आहेत? हा प्रश्न आता पडू लागला आहे.