У нас вы можете посмотреть бесплатно भौतिकशास्त्रज्ञ अतीश दाभोलकर यांची मुलाखत | Weekly Sadhana | Atish Dabholkar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भौतिकशास्त्रज्ञ अतीश दाभोलकर यांची मुलाखत संवादक : अजित केंभवी (माजी संचालक, आयुका) आणि विवेक सावंत (चीफ मेन्टॉर, एमकेसीएल) प्रयोग परिवाराचे प्रणेते श्री. अ. दाभोलकर आणि प्राध्यापक वृंदा दाभोलकर यांचा वारसा लाभलेल्या अतीश दाभोलकर यांचे सुरुवातीचे शिक्षण मौनी विद्यापीठ गारगोटी (जिल्हा कोल्हापूर) येथे झाले. 1985 मध्ये त्यांनी आयआयटी कानपूर येथून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि मग प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून पीएच.डी. केली. नंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट डॉक्टरल असोसिएट म्हणून तर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये सिनिअर रिसर्च फेलो म्हणून काम केले. 1996 मध्ये ते मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये प्राध्यापक म्हणून आले. 2006 मध्ये भारत सरकारच्या वतीने त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2019 पासून ते अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्सचे संचालक आहेत. क्वांटम ग्रॅव्हिटी, ब्लॅक होल्स, स्ट्रिंग थिअरी हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. अतीश यांची व्यक्तिगत जडणघडण, शैक्षणिक कारकीर्द व संशोधनाची वाटचाल याबरोबरच 'विज्ञान व समाज' आणि 'भारत व जग' इत्यादी घटक केंद्रस्थानी ठेवून ही 100 मिनिटांची मुलाखत होणार आहे. त्यांच्याशी संवाद साधणारे अजित केंभवी हे ज्येष्ठ खगोल भौतिकशास्त्रज्ञ असून, त्यांनी केंब्रिज युनिव्हर्सिटीतून पीएच.डी. केली, ते आयुकाचे संचालकही राहिले आहेत; तर विवेक सावंत यांनी 'सी-डॅक'मध्ये काम करताना भारताचा 'सुपर कंप्युटर' बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, नंतर ते एमकेसीएलचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आहेत. वेळ : मंगळवार 17 फेब्रुवारी 2026, सायंकाळी 6 ते 8 स्थळ : एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फाउंडेशनचे सभागृह, नवी पेठ, पुणे संयोजक : साधना साप्ताहिक व प्रकाशन । महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपर्क : साधना कार्यालय । 020-24451724 जयदीप Mob. 9552599629 #WeeklySadhana #Anis #SadhanaPrakashan #AtishDabholkar