У нас вы можете посмотреть бесплатно शिवरायांचे निष्ठावंत कान्होजी जेधे यांचा कारी येथील वाडा - व्याख्याते प्रशांत देशमुख. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भोरला एका व्याख्यानानिमित्ताने गेलो होतो. कान्होजी जेधे यांच्या कार्याच्या वाड्यात जाण्याचा योग आला. भोर येथील व्याख्यानाचे संयोजक डॉक्टर गोरेगावकर यांनी माझ्यासोबत संजय गोळे यांना जोडून दिले होते. त्यांनी आम्हाला रायरेश्वर किल्ला,नागेश्वराचे देवस्थान, कारीचा वाडा या सगळ्या गोष्टी दाखविल्या. कान्होजी जेधे यांच्या वाड्यामध्ये त्यांचे चौदावे वंशज रणधीर बाळासाहेब जेधे यांची भेट झाली. त्यांनी आम्हाला संपूर्ण वाडा दाखविला. महाराष्ट्र शासनाने जुना साज तसाच ठेवून त्याच्यामध्ये नवीन काही चांगले बदल केले आहेत. रणधीर जी नी आम्हाला आतलं देवघर, कान्होजी जेधे यांचे चिलखत, दांडपट्टा, त्यावेळच्या तोफेचा गोळा, त्यावेळच्या युद्धात वापरल्या गेलेल्या तलवारी हे सर्व दाखवलं. शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेण्यासाठी रायरेश्वराच्याच मंदिराची निवड करणे यासाठी कारणही कान्होजी जेधेच आहेत असे त्यांनी सांगितले. कर्नाटकात शहाजीराजांच्या समोर बेल रोटी ची शपथ घेतानाचा कान्होजी जेथे यांचा फोटो पाहायला मिळाला. विशेष म्हणजे माझ्याकडून लिहिल्या गेलेल्या 'जय शिवराय' या पुस्तकात वतनावर पाणी सोडलं राजे आणि तीन पिढ्यांचा त्याग अशी दोन प्रकरण जेथे कुटुंबीयांवर आहेत. लेखक प्रशांत देशमुख हे महाराष्ट्रातील उत्तम व्याख्याते आहेत. शिवव्याख्याते आहेत. करियर मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जगणं सुंदर आहे, पसायदान, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रतापगडचे युद्ध आणि शिवरायांची युद्धनीती, आग्र्याहून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून पलायन, सुरतेवरील छापा, संत ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र, राजमाता जिजाऊंचे चरित्र या विषयांवरील त्यांची व्याख्याने अनेक व्याख्यानमालांमध्ये गाजत आहे. त्यांच्याकडून लिहिले गेलेले, इतिहासाचा वर्तमानाशी सांधा जोडणारे 'जय शिवराय' हे पुस्तक सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची प्रस्तावना त्या पुस्तकाला लाभली आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे प्रशंसापत्रही त्या पुस्तकासाठी लाभले आहे. लेखक प्रशांत देशमुख यांचे 'गुड मॉर्निंग' हे पुस्तकही सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. या पुस्तकाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कारही मिळाला आहे. सरनोबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव असलेल्या चौक मध्ये लेखकांचे माध्यमिक शिक्षण झाले आहे. व्याख्याते प्रशांत देशमुख. हातनोली- चौक रायगड. मो. 9822 650 280 #shivajimaharaj #shivray #history #motivational_speech #maharashtrapolitics #inspiration #shivaji #shiv #shiva #shivajimaharajstatus #shivajiraje #shahistakhan #aurangjeb_baadshah #aurangjeb #fuladkhan #swaraj #swarajya #hindavi_swarajya #hindavi #मोटिवेशनल #motivation #motivationalspeech #viralvideo #education #shivray #व्याख्यान #lecture #kanhoji_jedhe #kari #nageshwar #nageshwartemple #nageshwara #kenjalgad #rayareshwar #vatan #vatansever #nishtha3 #afjalkhan #ambavde #rohida #rohid #rohid_khore