У нас вы можете посмотреть бесплатно * или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रिय शेतकरी मित्र, आज बिजोई कांदा प्लाट भेट प्रसंगी श्री प्रल्हाद भाऊ कुटे,गाव : मोरहिरा,तालुका व जिल्हा: छ संभाजी नगर,लागवड - २५ ते २० नोव्हेंबर २०२५ दरम्यान,क्षेत्र:- २० आर वापर केलेलं उत्पादने :- श्री प्लॅटिनो,श्री ९९९! आपण वीडियो मधे दाखवले प्रमाणे श्री प्रल्हाद भाऊ,सचिन,कृष्णा भाऊ व श्री चंद्रकांत भाऊ कुटे (सर्व युवा व तरुण शेतकरी)बिजोई कांदा लागवड ही नोव्हेंबर व डिसेंबर एंड मधे गोट कांद्याची पूर्ण केली असता,श्री बायो कडून काही जैविक खते व औषधे वापर केली असता अतिशय सुंदर रिझल्ट्स हे मिळाले आहेत…..यामधे एक बाब प्रकर्षाने जाणवेन की गावगातील युवक वर्ग हा शेती कडे व्यवसाय या दृष्टिकोनातून बघत असताना आपण बघू शकतो. असो आपला विषय यामध्ये बिजोई कांदा उत्पादन वाढ ही एकरी ४/४.५ क्विंटल पर्यंत मिळवणे असून,जवळपास २०० प्लस रजिस्टर कांदा बी कंपन्या या मागील ३/५ वर्षात तयार झाल्या असल्याने,यामधे आर्थिक उत्पन्न वाढ करण्यासाठी ऑप्पोरचुनिटी फार मोठी आहे तसेच आपल्या वेगवेगळ्या तालुक्यात घाऊक बाजारात व्यापारी वर्ग सुद्धा शेतकरी बांधवांना कांदा देऊन बिजोई कांदा बी खरेदी मोठ्या प्रमाणात व्यवसाय उदयास आला आहे. यामधे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपण जे कांदा बिजोई ही लावतो आहे त्याची क्वालिटी बाबत यामध्ये कांदा साईज,कांद्याला असलेला कोरडेपणा,कलर,काजळी नसलेला कांदा लागवडीस हवा नाहीतर खराब बिजोई कांदा हा आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. आता मागील ७/८ दिवस पासून सूर्यप्रकाश वाढ झाल्याने फुल किड चा प्रादुर्भाव हा वाढत असताना दिसत असताना,आता जवळपास ८०% ठिकाणी फुले किवा गोंडे उमलत आहेत त्यामुळे अशी ठिकाणी वीडियो मधे सांगितले प्रमाणे जैविक फवारणी ही करणे आवशयक आहे व त्या मधे मधमाशी वाढ होण्यासाठी दालचिनी,गूळ व देशी ताक घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच तापमान ही वाढ होत असताना ज्या ठिकाणी मोकळे पाणी भरले जाते आहे त्या ठिकाणी करपा वाढत असताना दिसत आहे व ज्या ठिकाणी क्षार व वाफसा स्थिती नाही त्या ठिकाणी हा प्रकार जाणवून येतो आहे…..तसेच डोंगर किवा पहाडी भागात काळ्या अळी चा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो आहे अश्या ठिकाणी रासायनिक मधून क्लोरो किवा सायपर चा वापर ठिबक न करता जैविक बुरशीनाशक मधून बासकॉन प्रती १ किलो वापर हा करावा…संपूर्ण १००% कवरेज हे मिळेल काळ्या अळी ला व फूल किडीची पुपा स्टेज चे नियंत्रण हे १००% मिळते त्यामुळे वरील फुलातील किवा दांड्यावरील किवा पोंग्यातील फूल किड प्रादुर्भाव हा कमी असेन. आपला मुख्य विषय येथून पुढे मधमाशी संगोपनच्या दृष्टिकोनातून योग्य जैविक फवारण्या व ठराविक रासायनिक खते व जैविक खते वापर हा करणे आवश्यक आहे…..एकतर मागील महिन्यात वातावरण हे थंड असल्याने बिजोई कांद्या मधे फुले ही लवकर उमलली आहेत ज्या शेतकरी बांधवांच्या पसात लागवडी या आहेत खास करून डिसेंबर मध्य,एंड किवा जानेवारीला सुरुवात मधे…….त्यामुळे शाकीय वाढीला फटका तेथे बसलेला दिसत असून,लेंगिक अवस्था ही लवकर प्राप्त झाल्याने अश्या ठिकाणी उत्पादन घट ही मोठ्या प्रमाणे जाणवून येईल. आज आपण रासायनिक माध्यमातून जास्त उत्पादन घेण्याचा जो हव्यास निर्माण झाला आहे शेतकरी बांधवांमध्ये व स्पर्धेत टिकून राहावे यामुळे आपण कुठतरी प्रकुर्तीचा रहास करण्यामागे लागलो आहेत पण प्रकृती ही त्याची जागा नक्की दाखवते व त्यामध्ये कोणीही सुटणार नाहीत……जैविक शेती किवा विषमुक्त शेती मधून आपण लगेच काही श्रीमंत होणार नाही आहेत ……पण कालांतराने आपल्याला त्याची समज,सत्यत्व व महत्व हे वारंवार वापर केल्याने आपल्याला लक्षात येईल एवढेच या लेख मधून सूचित करणे आहे,अजून काय सांगू आपल्याला इतकी शेतीची भयावह अवस्था निर्माण झाली असल्याने…..आपल्याला आपल्या मर्यादा या ओळखूनच भविष्याचे आराखडा सादर करणे आवश्यक आहे. आपला कृषी मित्र, शामकांत महाजन श्री बायो एस्थेटिक्स हैदराबाद फुलंब्री,छ संभाजी नगर 82755 06166!!!