У нас вы можете посмотреть бесплатно शास्त्रज्ञ डॉ. विनिता गोतमारे यांनी तपकिरी कापसावर कसं संशोधन केलं? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कापूस म्हणजे फक्त पांढरा अशीच सर्वांची धारणा असते, पण नागपुरात विकसित झालेल्या तपकिरी कापसाच्या गोष्टीमुळे ही धारण बदलते. नागपुरातील कापूस अनुसंधान केंद्रात जंगली जातींपासून विकसित झालेल्या नैसर्गिकरित्या रंगीत तपकिरी कापसाचा प्रवास हाप्रयोगशाळेपासून शेतापर्यंत आणि शेतापासून खादीच्या कपड्यांपर्यंत कसा आहे? हे या व्हीडिओत तुम्ही पाहू शकता. गेल्या 25 वर्षांपासून रंगीत कापसावर संशोधन करणाऱ्या डॉ. विनिता गोतमारे यांनी विकसित केलेली ‘वैदही-१’ ही पहिली तपकिरी कापसाची जात आज पर्यावरणपूरक कापड उद्योगासाठी आशेचा किरण ठरतेय. या कापसाला रासायनिक डायची गरज नाही, पाण्याचा वापर कमी होतो आणि प्रदूषण टाळता येतं. पण तरीही धोरणांच्या अभावामुळे हा कापूस अजून मुख्य प्रवाहात का आलेला नाही? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. शास्त्रज्ञ, वर्ध्यातील शेतकरी, खादी ग्रामोद्योगातील कामगार, तज्ज्ञ आणि ग्राहक या सगळ्यांचे अनुभव बीबीसी मराठीने जाणून घेतले जागतिक पातळीवर कापड उद्योगामुळे होणाऱ्या प्रदूषणाची आकडेवारी धक्कादायक आहे. World Resources Institute (WRI) आणि United Nations Environment Programme (UNEP) यांच्या माहितीनुसार, कापड उद्योग पाणी प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनात मोठा वाटा उचलतो. या पार्श्वभूमीवर, तपकिरी कापूस हा पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो का? रिपोर्ट- भाग्यश्री राऊत शूट- मनोज आगलावे व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर #cotton #agrotechnology #agriculture #indianfarmer #marathinews बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi