У нас вы можете посмотреть бесплатно रस्टी पळून जातो प्रकरण ७ – ममतासोबत ट्रकमधून प्रवास или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रस्किन बॉन्ड यांच्या कुमारांसाठी लिहिलेल्या प्रसिद्ध कादंबरिकेवर आधारित “रस्टी पळून जातो” या मालिकेचे हे सातवे प्रकरण आहे. या भागात रस्टी आणि दलजीत दिल्लीजवळ एका ट्रकमध्ये बसून पुढचा प्रवास सुरू करतात. त्या ट्रकमध्ये आधीपासूनच “ममता” नावाची धष्टपुष्ट पंजाबी म्हैस असते. या विचित्र पण विनोदी प्रवासाची ही गोष्ट. जर तुम्हाला कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राइब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये जरूर लिहा. या मालिकेचे इतर भाग येथे पाहा: • रस्टी पळून जातो (Rusty runs away या रस्किन... रस्किन बॉन्ड यांंना भारताचे वर्डस्वर्थ म्हटले जाते. नव्वदी पार केलेल्या रस्किन बॉन्ड यांनी मुले आणि कुमारांसाठी अनेक कादंबर्या लिहिल्या असून रस्टी रन्स अवे (रस्टी पळून जातो) ही त्यापैकी एक असलेली धमाल कादंबरी. तिचा मी मराठी अनुवाद केला असून तो सध्या आपण ऐकत आहोत. कादंंबरिकेचे कथासूत्र : रस्टी हा या कथेचा नायक आहे. हा 13-14 वर्षांचा, भारतात जन्माला आलेला अॅंग्लो इंडियन मुलगा असून रस्किन बॉंड यांनी स्वत:चे बालपण रस्टीच्या रूपात आपल्या लिखाणात रंगवले आहे. त्यांच्या कुमारांसाठीच्या बर्याच कथा व कादंबर्यांमध्ये रस्टी हा नायक आहे. या सर्व कथा कसौली, देहरादून या हिमालयीन प्रदेशात घडतात. रस्टी रन्स अवे मध्ये अरुंडेल निवासी शाळेत शिकणारा रस्टी शाळेला कंटाळला आहे. त्याच्याप्रमाणेच कंटाळलेल्या दलजीत या मित्राच्या सोबतीने तो पळून जाण्याचा बेत आखतो. जामनगर येथे त्याच्या जिमकाकाची बोट येणार असून तिच्यात बसून आफ्रिकेला पळून जाण्याचा बेत दोघे आखतात आणि शाळेपासून 800 मैल दूर असलेल्या जामनगरकडे पळ काढतात. या प्रवासात त्यांच्यावर कोणकोणती संकटे येतात, त्यांना कशाकशाशी सामना करावा लागतोआणि कशकशा मार्गाने प्रवास करावा लागतो याची ही धमाल कहाणी आहे. ही वाचतांना मुले तर रंगून जातातच पण मोठी माणसं सुद्धा आपले वय विसरून लहान होतात. कारण प्रत्येकानेच हे स्वप्न आपल्या मनाशी रंगवले असते. काहींचे खरे होते काहींचे मनातच राहते. पण रंगवले असते जरूर!