У нас вы можете посмотреть бесплатно वाईचा पांडवगड मोहिम फत्ते 🚩✌ दिनांक ९ मार्च २०२५ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वाई ऊर्फ विराटनगरीला अनेक डोंगरांचा निसर्गरम्य वेढा पडलेला आहे. डोंगराच्या या वेढ्यात पांडवगड, वैराटगड, केंजळगड, अशी अनेक दुर्गरत्ने पाहायला मिळतात. वाई जवळ आले की, सारी दुर्गशिखरे त्यांच्या माना वर करत डोकाऊ लागतात. यातच त्यांच्या विशिष्ठ आकाराने उठून दिसतो तो पांडवगड! या पांडवगडाकडे जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक म्हणजे वाईजवळच्या मेणवली गावातून, तर दुसरी धावडी गावाच्या हद्दीतून. या दोन्हीही वाट अंगावर येणाऱ्या पण त्यातही धावडीकडची तुलनेने थोडी कमी श्रमाची आहे. वाई मांढरदेव मार्गावर धावडी हे गाव. वाईहून याचे अंतर सात किलोमीटरचे. पांडवगडाला खेटून चार-पाच घरांची वस्ती लागते. इथून हा गड आणि त्यचा कातळ अगदी अंगावर येतो. येथे गिर्यारोहण करतांना बूट, पाठीवरची सँक घट्ट करायची आणि खंबीर पावलांनी गड चढू लागायचे. पांडवगडची उंची सुमारे ४१७० फुट म्हणजेच १२७३ मीटर आहे. शिलाहार राजाभोज याने सातारा जिल्यात जे काही दुर्ग निर्माण केले त्यापैकी पांडवगड हा एक! निसर्गाचे सौंदर्य घेऊन जन्माला आलेला. छातीवर येणारा चढ आणि घनदाट झाडी… पांडवगडचा हाच अनुभव ट्रेकर्सला सुरुवातीला अनुभवायला मिळतो. गिर्यारोहक सोडले तर मुळात इकडे कोणी येत नाही. चार गुरख्यांच्या वर्दळीने पडलेली पायवाट, पण पावसाला उलटला की या गडावर बेसुमार गवत माजते आणि आहे ती पाऊलवाटही झाकून जाते. हे गवतही अगदी डोक्याहून उंचीचे. अशा दाटीतून मार्ग काढत, गडाकडे सरकावे लागते. साऱ्या अंगाला गवताची कुसळे टोचू लागतात. सरपटणाऱ्या जीवांचे भय ते वेगळेच! त्यामुळे इकडे फक्त साहसी ट्रेकर्सच येतात. परंतु पांडवगडचा प्रवास कठीण असला तरी मात्र या प्रवासात निसर्गाचे सौंदर्य मिळते. याठिकाणी कारवी, तेरडा, सोनकी, हळुंदा, लाजाळू कवळा, कोंबडतुरा व तालीमखाना अशा कधीही ण पाहिलेल्या रानफुलांचे दर्शन होते.